महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL 2022 Mega Auction:एम एस धोनी मेगा लिलावापूर्वी चेन्नईत दाखल - IPL 2022 Mega Auction

चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार एम एस धोनी आयपीएल 2022 च्या मेगा लिलावाच्या (IPL 2022 Mega Auction) अगोदर चेन्नईत दाखल झाला आहे. धोनीचा कर्णधार म्हणून हा आयपीएलचा लिलाव अखेरचा असू शकतो. त्यामुळे धोनी या लिलावासाठी हजर राहण्याची शक्यता आहे.

MS Dhoni
MS Dhoni

By

Published : Jan 28, 2022, 3:12 PM IST

चेन्नई:भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला (Former India captain Mahendra Singh Dhoni) सीएसके फ्रॅंचायझीने 12 कोटी देऊन रिटेन केले आहे. यंदाची अयपीएल स्पर्धा ही धोनीसाठी खेळाडू म्हणून अखेरची ठरु शकते. तसेच महेंद्रसिंग धोनी हा आयपीएल स्पर्धेच्या मेगा लिलावाच्या अगोदर चेन्नई मध्ये दाखल झाला आहे. त्याचबरोबर 12 आणि 13 तारखेला आयपीएल 2022 चा मेगा लिलाव पार पडणार आहे. त्यासाठी महेंद्रसिंग धोनी हा चेन्नईमध्ये दाखल झाला आहे. याबाबत सीएसके फ्रॅंचायझीने धोनी चेन्नईत आल्याचा फोटो आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे.

सूत्राने इनसाइडस्पोर्टला सांगितले की, हो, आज तो चेन्नईमध्ये दाखल झाला (MS Dhoni arrives in Chennai) आहे, तो लिलावाच्या चर्चेत सहभागी होणार आहे. त्याचबरोबर तो लिलावासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. परंतु तो माहीचा निर्णय आहे आणि त्याला लिलावा जवळ असताना एक कॉल केला जाईल.

चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने लिलावाच्या अगोदर चार खेळाडूंना रिटेन केले आहे. यामध्ये कर्णधार महेंद्र सिंग धोनी, रवींद्र जडेजा, रुतुराज गायकवाड आणि मोइन अली या खेळाडूंचा सहभाग आहे. तसेच रवींद्र जडेजा सर्वाधिक पैसे देत रिटेन केले आहे. त्याला तब्बल 16 कोटी रुपये देण्यात आले आहे. त्याचबरोबर धोनीला 12 कोटी, मोइन अली 8 कोटी आणि रुतुराज गायकवाडला 6 कोटी देण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details