मुंबई: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 32 वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज ( Delhi Capitals vs Punjab Kings ) संघात खेळला जाणार आहे. हा सामना बुधवारी (20 एप्रिल) होणार आहे. तत्पुर्वी या सामन्याबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने या सामन्याचे स्थळ बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी हा सामना पुण्यातील एमसीए स्टेडियमवर होणार होता, मात्र आता तो मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर ( Mumbai's Brabourne Stadium ) होणार आहे.
दिल्ली कॅपिटल्सच्या ( Delhi Capitals ) कॅम्पमध्ये कोविडची प्रकरणे पाहता बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच प्रवासादरम्यानचा धोका कमी करण्यासाठी सामन्याचे ठिकाणच बदलण्यात आले आहे. बीसीसीआयने आपल्या एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सामन्यच्या स्थलांतराचा निर्णय घेण्यात आला आहे. बंद वातावरणात लांब पल्ल्याच्या बस प्रवासादरम्यान कोणतीही अनोळखी प्रकरण घडू नये म्हणून सामना हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.