मुंबई:आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील तिसरा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर पार पडला. हा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स ( Delhi Capitals vs Mumbai Indians ) संघात खेळला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 4 विकेट्सने मुंबई संघाला पराभवाचे पाणी पाजले. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 177 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्ली संघाने 18.2 षटकांत 6 बाद 179 धावा करत विजय मिळवला.
IPL 2022 MI v DC: दिल्लीने 4 विकेट्सने मुंबईला पाजले पराभवाचे पाणी; ललित-अक्षरची 75 धावांची अतूट भागीदारी - आयपीएलच्या बातम्या
ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने 4 विकेट्सने मुंबई संघाला पराभवाचे ( Delhi Capitals won by 4 wkts ) पाणी पाजले आहे. त्याचबरोबर दिल्ली संघाने पंधराव्या हंगामातील आपल्या पहिल्या दोन गुणांची कमाई केली. त्याचबरोबर पहिल्या सामन्यात मुंबईची गुणांची पाटी कोरी राहिली.
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचबरोबर मुंबई संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यानुसार मुंबईचे सलामीवीर रोहित शर्मा ( Opener Rohit Sharma ) आणि इशान किशनने पहिल्या विकेट्साठी शानदार 67 धावांची भागीदारी केली. त्यानंतर रोहित शर्मा 41 धावांवर बाद झाला. त्यानंतर इशान किशनने मोर्चा सांभाळताना 48 चेंडूचा सामना करताना 11 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने धुवांदार पारी खेळत संघाला 177 धावासंख्या उभारुन दिली. त्याच्या व्यतिरिक्त तिलक वर्मा 22 आणि टीम डेविडने 12 धावांचे योगदाने दिले. दिल्लीकडून कुलदीप यादवने 3 आणि खलील अहमदने 2 विकेट्स घेतल्या.
178 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या दिल्लीने देखील दमदार सुरुवात केली. दिल्लीच्या सलामीवीर पृथ्वी आणि टीम सेफर्टने साडेतीन षटकांत 30 धावांची भागीदारी केली. त्यानंतर टीम सेफर्ट 21 धावांवर बाद झाला. त्यानंतर पृथ्वी शॉने आपली खेळी सुरु ठेवताना 24 चेंडूत 38 धावांचे योगदान दिले. त्यानंतर अष्टपैलू ललित यादव ( All-rounder Lalit Yadav ) आणि अक्षर पटेलने यांनी डावाची कमान हाती घेत सातव्या विकेट्साठी नाबाद 75 धावांची खेळी करताना 18.2 षटकांत 6 बाद 179 धावा करत विजय मिळवून दिला. यामध्ये 38 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकार लगावत नाबाद 48 धावा केल्या. त्याचबरोबर अक्षर पटेलने नाबाद 17 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकार लगावत 38 धावांची भागीदारी केली. मुंबईकडून बसिल थंम्पीने 3, मुरुगन आश्विन 2 आणि मिल्सने एक विकेट्स घेतली.