मुंबई: गुरुवारी (7 एप्रिल) लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ( Lucknow Super Giants Vs Delhi Capitals ) संघात आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील पंधरावा सामना पार पडला. डी. वाय. पाटील स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात लखनौ संघाने दिल्ली कॅपिटल्सचा 6 गडी राखून पराभव ( Lucknow Super Giants won by 6 wkts )केला. या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सला आणखी एक मोठा धक्का ( Big blow to Delhi Capitals ) बसला आहे.
लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध ( Lucknow Super Giants ) सामन्यात त्यांच्या संघाने षटकांची गती संथ राखल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलने एका निवेदनात म्हटले आहे की, "या हंगामातील संघाचे हे पहिले उल्लंघन होते, त्यामुळे हा दंड करण्यात आला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतला ( Captain Rishabh Pant fined ) षटकांची गती संथ ( Slow over rate ) राखल्याच्या उल्लंघनासाठी आयपीएल आचारसंहितेनुसार 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता."