महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

कसोटी क्रिकेटचे दिग्गज वॉर्नर अन् एल्गर खेळणार अखेरचा सामना, एक नजर आकडेवारीवर - एल्गर

David Warner Dean Elgar : कसोटी क्रिकेटमधील दोन दिग्गज फलंदाज, ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर आणि दक्षिण आफ्रिकेचा डीन एल्गर बुधवारपासून शेवटचा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरतील. दोघांची या फॉरमॅटमधील कारकीर्द अत्यंत उत्कृष्ट राहिली आहे.

David Warner Dean Elgar
David Warner Dean Elgar

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 2, 2024, 7:25 PM IST

हैदराबाद David Warner Dean Elgar :ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर आणि दक्षिण आफ्रिकेचा डीन एल्गर या दोन फलंदाजांनीकसोटी क्रिकेटमध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीनं जगभरातील गोलंदाजांच्या मनात धडकी भरवली आहे. हे दोन्ही डावखुरे सलामीवीर उद्या (३ जानेवारी) आपला शेवटचा कसोटी सामना खेळतील. त्यांनी आधीच याबाबतची घोषणा केली होती.

दोघांची कसोटी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी : डेव्हिड वॉर्नर सिडनीमध्ये पाकिस्तानविरुद्ध आपला अखेरचा कसोटी सामना खेळेल. तर एल्गर बुधवारपासून केपटाऊनमध्ये भारताविरुद्ध खेळताना दिसणार आहे. या दोन्ही खेळाडूंनी कसोटी फॉरमॅटमध्ये आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली असून, दोघांचे आकडे खूप चांगले आहेत.

डेव्हिड वॉर्नर : ऑस्ट्रेलियाचा डावखुरा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. जगभरातील भल्या-भल्या गोलंदाजाची लाईन आणि लेन्थ कशी खराब करायची हे त्याला चांगलंच ठावूक आहे. कसोटी क्रिकेटमध्ये वॉर्नरची आकडेवारी उत्कृष्ट आहे. त्यानं 111 कसोटी सामन्यांच्या 203 डावांमध्ये 8695 धावा ठोकल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 44.59 एवढी राहिली. 335 ही त्यांची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या आहे. कसोटी क्रिकेटमध्ये वॉर्नरच्या नावावर 26 शतकं आणि 36 अर्धशतकं असून, या दरम्यान त्यानं 2 द्विशतकंही ठोकली आहेत.

डीन एल्गर : डावखुरा सलामीवीर फलंदाज डीन एल्गरनं 85 कसोटी सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केलं. एल्गर त्याच्या उत्कृष्ट फलंदाजी तंत्रासाठी ओळखला जातो. एल्गरची फलंदाजीची शैली कसोटीसाठी योग्य आहे. एल्गरची आकडेवारी सुद्धा हेच दर्शवते. एल्गरनं 85 कसोटी सामन्यांच्या 150 डावात फलंदाजी करताना एकूण 5331 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 14 शतकं आणि 23 अर्धशतकं आहेत. 199 ही त्याची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या आहे. भारताविरुद्धच्या सेंच्युरियन कसोटीत एल्गरनं 185 धावांची इनिंग खेळली होती.

हे वाचलंत का :

  1. क्रिकेट चाहत्यांना यंदा टी-२० वर्ल्डकपची मेजवानी, 'या' महिन्यात रंगणार आयपीएलचा थरार; जाणून घ्या टीम इंडियाचं वर्षभराचं वेळापत्रक
  2. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलिया क्रिकेटला मोठा धक्का; 'या' दिग्गज खेळाडूनं वनडे क्रिकेटलाही केलं 'अलविदा'
  3. गौतम गंभीरची मोठी भविष्यवाणी; 'हा' संघ टी २० विश्वचषकात भारतासाठी धोका असल्याचं म्हणाला

ABOUT THE AUTHOR

...view details