नवी दिल्ली :आयपीएल 2022 ( IPL 2022 ) च्या हंगामाला सुरुवात होण्यसाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. तत्पुर्वी दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेन ( Former fast bowler Dale Steyn ) आयपीएल 2022 च्या आधी गुरुवारी भारतात आला ( Dale Steyn arrives India ) आहे. तो यंदाच्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघासाठी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून भूमिका पार पाडणार आहे. त्यांचा हा नवीन प्रवास सुरू करण्यास उत्सुक आहे. 38 वर्षीय, जो एसआरएचकडून देखील आयपीएल स्पर्धा खेळला आहे. तो आता फ्रेंचायझीच्या कोचिंग स्टाफमध्ये सामील झाला आहे, ज्यात मुख्य प्रशिक्षक टॉम मूडी, फलंदाजी प्रशिक्षक ब्रायन लारा आणि फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक मुथय्या मुरलीधरन यांचा समावेश आहे.
सनरायझर्स हैदराबाद संघासाठी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून भूमिका पार (Bowling coach Dale Steyn ) पाडण्यागोदर त्याच्या भावना जाणून घेतल्या, तेव्हा स्टेन म्हणाला, होय, इथे परत आल्याने मला खूप आनंद झाला आहे. मी बराच काळ भारतात आहे. त्यामुळे मी परत येण्यासाठी खूप उत्सुक आहे. विमानतळावरून गाडी चालवताना खूप आठवणी जाग्या झाल्या. माझ्यासाठी एक नवीन भूमिका, प्रशिक्षकाची भूमिका ज्याबद्दल मी खूप उत्सुक आहे.