बर्मिंगहॅम:कॉमनवेल्थ गेम्स 2022 मधील क्रिकेटचा सेमीफायनल सामना भारतीय महिला संघ आणि आणि इंग्लंड महिला संघ यांच्यात ( INDW vs ENGW ) खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघाला 4 धावांनी पराभूत ( India women won by 4 runs ) केले. त्याचबरोबर भारतीय संघाने फायनलमध्ये धडक मारली आणि आपले पदक निश्चित केले आहे.
या सामन्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने ( Captain Harmanpreet Kaur ) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 164 धावा केल्या होत्या. त्याचवेळी लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाला 20 षटकांत 6 गडी गमावून केवळ 160 धावा करता आल्या. त्यामुळे भारतीय संघाने 4 धावांनी सामना जिंकला.
उपकर्णधार स्मृती मंधाना हिने धमाकेदार अर्धशतक -
भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घतल्यानंतर भारताची उपकर्णधार स्मृती मंधाना हिने धमाकेदार अर्धशतक ( Vice-captain Smriti Mandhana half-century ) झळकावले. तिच्या अर्धशतकी आणि जेमिमाह रॉड्रिगेज हिच्या नाबाद 44 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने इंग्लंडला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाने ताबडतोड सुरुवात केली. आणि पहिल्या विकेटसाठी 2.5 षटकांत 28 धावा जोडल्या. त्यानंतर इंग्लंड संघाने आपले फलंदाजीतील आक्रमण सुरू ठेवले आणि प्रत्येक वेळी लक्ष्य आपल्या हाताबाहेर जाणार नाही याची काळजी घेतली.