महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

CWG 2022, INDW vs AUSW Final Match : भारतीय महिला क्रिकेट संघाचं स्वप्न भंगलं! रौप्यपदकावर समाधान मानत, अवघ्या 9 धावांनी भारताचा पराभव - INDW vs AUSW Final Match

CWG 2022, INDW vs AUSW Final Match : ऑस्ट्रेलियाने प्रथम खेळून 20 षटकांत 8 बाद 161 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ केवळ 152 धावा करू शकला.

CWG 2022
CWG 2022

By

Published : Aug 8, 2022, 7:03 AM IST

Updated : Aug 8, 2022, 7:26 AM IST

CWG 2022, INDW vs AUSW Final Match: एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे खेळल्या गेलेल्या 2022 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 9 धावांनी पराभव केला आहे. यासह भारतीय संघाचे सुवर्ण जिंकण्याचे स्वप्नही देखील अधुरे राहिले आहे. त्यामुळे त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम खेळून 20 षटकांत 8 बाद 161 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ केवळ 152 धावा करू काढू शकले आहे.

या विजयासह ऑस्ट्रेलियाने २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. त्याचबरोबर अंतिम फेरीत पराभूत झालेल्या भारतीय संघाला रौप्यपदक मिळाले आहे. विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाने रविवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पहिल्या T20 महिला क्रिकेटच्या अंतिम सामन्यात भारताचा ९ धावांनी पराभव करून सुवर्णपदक जिंकले आहे. त्यामुळे भारतीय संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे.

भारताच्या जबरदस्त खेळीसमोर बेथ मुनीच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 8 बाद 161 धावा केल्या. प्रत्युत्तरात कर्णधार हरमनप्रीत कौरने 43 चेंडूत 65 धावा काढले आहे, पण खालच्या फळीतील फलंदाज संघाला विजयापर्यंत नेऊ शकले नाहीत. भारतीय संघ 19.3 षटकात 152 धावांवर खेळी खेळली आहे. ऑस्ट्रेलियाने शेवटच्या ५ विकेट 13 धावांच्या आत केले आहे. स्पिनर एशले गार्डनरने 16 धावांत ३ बळी घेतले आहे. भारताकडून जेमिमा रॉड्रिग्जने 33 चेंडूत 33 धावा केल्या तर शेफाली वर्मा (11) आणि दीप्ती शर्मा (13) यांनी दुहेरी आकडा गाठला आहे.

यापूर्वी खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या भारतीय वेगवान गोलंदाज रेणुका सिंग ठाकूरने धोकादायक एलिसा हीलीला सुरुवातीच्या लेग बिफोर बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले आहे. डीआरएसवर अंपायरने गोलंदाजाच्या बाजूने यावेळी निर्णय दिला आहे.

हेही वाचा -Sanjay Raut ED Custody : संजय राऊतांची ईडी कोठडी आज संपणार जामीन मिळणार? आज पुन्हा कोर्टात सुनावणी

हेही वाचा -Har Ghar Tiranga : 'या' कारणाने 'हर घर तिरंगा' मोहिम वादात; राष्ट्रध्वजाचा अवमान होत असल्याचा काँग्रेसचा आरोप

Last Updated : Aug 8, 2022, 7:26 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details