नवी दिल्ली Shakib Al Hasan :बांगलादेशचा दिग्गज ऑलराऊंडर शाकिब अल हसन पुन्हा एकदा चुकीच्या कारणानं चर्चेत आला आहे. याआधी त्यानं पंचांना स्टम्पनं मारण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी देखील तो मारामारीमुळेच चर्चेत आला आहे.
शाकिबचं वादांशी जुनं नातं : शाकिब अल हसनचं वादांशी तसं जुनं नातं आहे. या आधीही तो अनेकदा वादात सापडला आहे. बांगलादेशमध्ये 7 जानेवारीला सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान पार पडलं. या निवडणुकीत शाकिब अल हसन उभा राहिला आहे. या दरम्यान त्यानं असं काही केलं की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. शाकिब असं काही करेल याची कोणालाही अपेक्षा नव्हती.
गर्दीत चाहत्याला थप्पड मारली : झालं असं की, निवडणुकीच्या वेळी जमलेल्या गर्दीत शाकिबनं एका व्यक्तीला जोरदार थप्पड मारली. ही संपूर्ण घटना एका व्हिडिओमध्ये कैद झाली आहे. विशेष म्हणजे, शाकिबनं असं काही करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. त्यानं यापूर्वीही असं केलंय. याआधीही त्यानं गर्दीत एका चाहत्याला थप्पड मारली होती.
मॅथ्यूजला टाईमआऊट केलं : शाकिब अल हसन नुकताच वर्ल्ड कप 2023 मध्ये खेळताना दिसला होता. विश्वचषकात श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यादरम्यान शाकिबनं श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूजला एकही चेंडू न खेळू देता टाईमआऊट केलं. मॅथ्यूजनं शाकिबला अपील न करण्याची विनंती केली. मात्र शाकिबनं ते मान्य केलं नाही. खेळाच्या भावनेच्या विरोधात जाऊन त्यानं पंचांना मॅथ्यूजला आऊट देण्यास सांगितलं. यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. सामन्यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंनी बांगलादेशच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता.
हे वाचलंत का :
- एकच वादा, रोहित दादा! कर्णधार म्हणून कायम; अफगाणिस्तानविरुद्ध टी 20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
- राजकारण नको रे बाबा! अंबाती रायुडूनं आठवडाभरातच सोडला 'हा' पक्ष
- धोनीला जिगरी दोस्तानेच लावला चुना, तब्बल 15 कोटींची फसवणूक!