मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीची ( MCA is Holding Elections in Next Few Days ) धामधूम सुरू आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याविरोधात सुप्रसिद्ध क्रिकेटपट्टू संदीप पाटील यांच्यात लढत होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच पाटलांवर हितसंबंधांचा ठपका ठेवण्यात आला आहे. ( BJP Mumbai President Ashish Shelar in Competition ) संदीप पाटील यांच्या ( Possibility Sandeep Patil Will be Thrown Out ) अडचणी वाढल्या असून, ते अध्यक्षपदाच्या स्पर्धेतून बाहेर फेकले ( MCA of Presidential Race ) जाण्याची शक्यता आहे.
Cricketer Sandeep Patil in Trouble : प्रसिद्ध क्रिकेटपट्टू संदीप पाटील अडचणीत; एमसीए अध्यक्षपदाच्या स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता? - Cricketer Sandeep Patil is Likely Possibility
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीची ( MCA is Holding Elections in Next Few Days ) धामधूम सुरू आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याविरोधात सुप्रसिद्ध क्रिकेटपट्टू संदीप पाटील यांच्यात लढत होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच पाटलांवर हितसंबंधांचा ठपका ठेवण्यात आला आहे. संदीप पाटील यांच्या अडचणी वाढल्या असून, ते अध्यक्षपदाच्या स्पर्धेतून बाहेर फेकले ( MCA of Presidential Race ) जाण्याची शक्यता ( Possibility Sandeep Patil Will be Thrown Out ) आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशन येत्या काही दिवसांत निवडणूक होत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसेचे सर्वेसर्वा शरद पवार, भाजप नेते आशिष शेलार, शिवसेना ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर, शिंदे गटाचे प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव एकाच पॅनेलमधून निवडणूक लढवत आहेत. आशिष शेलार यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज केला असून, त्यांना प्रसिध्द क्रिकेटपट्टू संदीप पाटील यांचे आव्हान असणार आहे. निवडणूक आशिष शेलार यांना जड जाणार असल्याचे बोलले जाते. मात्र, त्यापूर्वीच संदीप पाटील यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. संदीप पाटील यांनी त्यांच्या पॅनेलमध्ये केवळ क्रिकेटपट्टूंनाच स्थान दिल्याने हा आक्षेप घेण्यात आल्याची चर्चा आहे.
क्रिकेटचे मैदान गाजवणाऱ्या संदीप पाटील यांनी मुंबई क्रिकेट गट स्थापन केला. या गटामार्फत ते रिंगणात असणार आहेत. मात्र, कॉन्फलिक्ट ऑफ इंट्रेस्टच्या नियमाचा (हितसंबध) ठपका पाटील यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी सचिव संजय नाईक यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे चीफ सिलेक्टर सलील अंकोला हे संदीप पाटील यांचे साडू असून, त्यांनी निवडणूक लढवू नये, अशी हरकत घेतली आहे. आज उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रिया सुरू आहे. त्यापूर्वीच संजय नाईक यांनी अर्ज दाखल केल्याने संदीप पाटील या निवडणुकीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. मात्र, निवडणूक पीठासीन अधिकारी यावर निर्णय देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.