भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू कृष्णप्पा गौतम हा त्याचा सहखेळाडू आणि चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) चा टीममेट ऋतुराज गायकवाड याच्यासोबत भाषेची मनोरंजक देवाण घेवाण करताना दिसला. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय)ने आयोजित केलेल्या लँग्वेज एक्स्चेंज सत्रामध्ये दोघांनी भाग घेतला होता.
त्यांच्या भाषेच्या सत्राची एक मजेदार क्लिप बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केली आहे. "टीम इंडियाचा कृष्णप्पा गौतम आणि ऋतुराज गायकवाड याच्यासोबत भाषा विनिमय सादर करीत आहे. बॅंटर, लाफ्टर, क्रिकेट स्लेजेस," असे कॅप्शन या व्हिडिओल बीसीसआयने दिले आहे.
व्हिडिओ क्लिपमध्ये आपण पाहू शकतो की गौतम काही कन्नड शब्द ऋतुराजला शिकवण्याचा प्रयत्न करतोय. याच्या बदल्यात ऋतुराजही कृष्णप्पाला मराठी शब्द शिकवताना दिसतोय.
व्हिडिओमध्ये गौतमने ऋतुराज याला 'कन्नड' हा शब्द कसा योग्य उच्चारायचा हे समजावले. बीसीसीआयला फॉलो करणाऱ्यांनी या प्रयत्नाचे कौतुक केले आहे. वेगवेगळ्या भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी उचललेल्या या पाऊलांमुळे चाहते सुखावले आहेत.
"कन्नडिगा जेव्हा महाराष्ट्रीयनला भेटतो", अशी एक प्रतिक्रिया हसऱ्या इमोजीसह एका चाहत्याने दिली आहे.
"कन्नड नाही कन्नडा," अशी एकाने टिप्पणी केली आहे.