लखनौ : क्रिकेटपटू पीयूष चावलाच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. पीयूष चावलाने सोशल मीडियात पोस्ट टाकून याची माहिती दिली आहे. त्यांच्या निधनावर यूपीसह क्रिकेट वर्तुळातून शोक व्यक्त होत आहे.
इन्स्टाग्रामवरून दिली माहिती

पीयूष चावलाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट टाकून याची माहिती दिली आहे. गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू होते. "माझे वडील प्रमोद कुमार चावला यांचे दहा मे रोजी दुःखद निधन झाले आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनानंतरच्या गुंतागुंतीने त्यांचा मृत्यू झाला आहे. या दुःखद प्रसंगात तुमच्या प्रार्थनांचा आम्ही स्वीकार करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चीरशांती देवो" अशी पोस्ट टाकून पीयूष चावलाने वडीलांच्या निधनाची माहिती दिली आहे.
भारतीय संघातील फिरकी गोलंदाज असलेल्या पीयूष चावलाने अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यांत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत चमकदार कामगिरी केली आहे.