नवी दिल्ली: कार अपघातात अँड्र्यू सायमंड्सच्या मृत्यूनंतर ( Andrew Symonds dies in car accident ), भूतकाळातील आणि वर्तमान जगभरातील क्रिकेटपटूंनी त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली, ज्यात त्याच्या ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडू आणि आंतरराष्ट्रीय आजी माजी खेळाडूंन या बातमीने धक्का बसला. ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टिरक्षक अॅडम गिलख्रिस्टपासून ते वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पीपर्यंत, भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि माजी फिरकीपटू हरभजन सिंग यांनी शनिवारी रात्री क्वीन्सलँडमध्ये कार अपघातात मरण पावलेल्या अष्टपैलू खेळाडूला श्रद्धांजली वाहिली आहे.
सायमंडला लोक प्रेमाने 'रॉय' म्हणायचे. तो 46 वर्षांचा होता. त्याच्या कुटुंबात पत्नीशिवाय त्याला दोन मुले आहेत. 2003 चा विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाचा सदस्य असलेल्या गिलख्रिस्टने ट्विटरवर लिहिले, 'आमचा सर्वात विश्वासू, मजेदार मित्राचा विचार करा, जो तुमच्यासाठी काहीही करू शकेल असा रॉय होता. यामुळे खूप त्रास झाला आहे. सायमंड्ससोबत खेळणाऱ्या गिलेस्पीने ट्विट केले की, 'सकाळी उठलो तेव्हा खूप वाईट बातमी मिळाली. मी खूप निराश आहे. आम्हा सर्वांना तुझी उणीव भासेल मित्रा.
2003 वर्ल्ड कप चॅम्पियन टीमचे आणखी एक सदस्य, मायकेल बेवन यांनी लिहिले, 'हृदयद्रावक बातमी. ऑस्ट्रेलियन क्रिकेटने आणखी एक नायक गमावला. मला धक्का बसला. आम्ही 2003च्या विश्वचषक संघात एकत्र खेळलो. उत्कृष्ट प्रतिभा. त्याच्या आत्म्याला शांती लाभो.' या दु:खद बातमीने ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज डॅमियन फ्लेमिंगला धक्का बसला आहे. फ्लेमिंगने लिहिले, 'हे खूपच निराशाजनक आहे. रॉय यांची उपस्थिती मजेशीर होती. ही हृदयद्रावक बातमी आहे. सायमंड्सच्या कुटुंबासोबत आमच्या संवेदना आहेत. देवा रॉयच्या आत्म्याला शांती लाभो.
ऑस्ट्रेलियाचे माजी प्रशिक्षक आणि क्रिकेटपटू डॅरेन लेहमन ( Cricketer Darren Lehmann ) यांनीही ट्विटरवर शोक व्यक्त केला आहे. "तो एक महान माणूस होता, माझे त्यांच्यावर प्रेम होते आणि त्यांच्या कुटुंबाप्रती आम्ही शोक व्यक्त करतो," लेहमन म्हणाले. देवा रॉयच्या आत्म्याला शांती लाभो. आक्रमक फलंदाज असण्यासोबतच सायमंड्स मध्यमगती आणि फिरकी गोलंदाजी करण्यास सक्षम होता आणि उत्तम क्षेत्ररक्षक देखील होता. त्याने 1998 ते 2009 दरम्यान ऑस्ट्रेलियासाठी 26 कसोटी, 198 एकदिवसीय आणि 14 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. 2003 आणि 2007 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचा तो प्रमुख सदस्य होता.
तेंडुलकर, हरभजन आणि व्हीव्हीएस लक्ष्मणसह ( Cricketer VVS Laxman ) भारतीय क्रिकेटपटूंनीही सायमंड्सला श्रद्धांजली वाहिली. 2008 मध्ये सिडनी येथे झालेल्या वादग्रस्त कसोटी सामन्याचा भाग असलेल्या हरभजनने लिहिले, 'अँड्र्यू सायमंड्सच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. तू आम्हाला खूप लवकर सोडून गेलास. त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांच्या संवेदना. मी दिवंगत आत्म्यासाठी प्रार्थना करतो. तेंडुलकरने निधनाबद्दल शोक व्यक्त करताना लिहिले की, 'अँड्र्यू सायमंड्स यांच्या निधनाची बातमी आपल्या सर्वांसाठी धक्कादायक आहे. एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू असण्यासोबतच तो मैदानावरही खूप जीवंत होता. मुंबई इंडियन्समध्ये एकत्र वेळ घालवण्याच्या अनेक गोड आठवणी आहेत. त्याच्या आत्म्याला शांती लाभो, त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांप्रती संवेदना.
भारताचा माजी फलंदाज लक्ष्मणने लिहिले, 'सकाळी भारतात वाईट बातमी मिळाली. माझ्या प्रिय मित्रा, देव तुझ्या आत्म्याला शांती देवो. दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेनेही सायमंड्सच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला. त्यांनी लिहिले, 'अँड्र्यू सायमंड्सच्या निधनाची दुःखद बातमी मिळाली. त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि हितचिंतक यांच्या दुख:त आम्ही सहभागी आहोत. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आणि अफगाणिस्तानचा लेगस्पिनर राशिद खान यांनीही सायमंड्सला श्रद्धांजली ( Rashid Khan's tribute to Symonds ) वाहिली.
हेही वाचा -IPL 2022 GT vs CSK : नाणेफेक जिंकून सीएसकेचा प्रथम फलंदाजीचा निर्णय, दोन्ही संघाची अशी आहे प्लेइंग इलेव्हन