महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 : विश्वचषकापूर्वी खेळाडूंना सामन्यावर लक्ष केंद्रित करण्याचा रोहित शर्माचा सल्ला - कर्णधार रोहित शर्मा

Cricket World Cup 2023 : भारतीय संघ तिसऱ्यांदा 50 षटकांचा विश्वचषक जिंकण्यात यशस्वी होण्याची अपेक्षा आहे. भारतानं 2011 मध्ये स्वतःच्याच भूमीवर विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर 2015 मध्ये ऑस्ट्रेलियानं 2019 मध्ये इंग्लंडनं त्यांच्याच भूमीवर विजेतेपद पटकावलं होतं. आज कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, त्याला एकावेळी एका सामन्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे.

Cricket World Cup 2023
Cricket World Cup 2023

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 4, 2023, 10:28 PM IST

हैदराबादCricket World Cup 2023 : 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ICC विश्वचषक 2023 स्पर्धेची सुरवात अवघ्या काही वेळावर येऊन ठेपली आहे. या विश्वचषकात रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करताना दिसणार आहे. एमए चिदंबरम स्टेडियमवर 8 ऑक्टोबरला भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. याआधी आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये वर्ल्ड कप प्लेइंग कॅप्टन्स डे साजरा करण्यात आला. त्यादरम्यान सर्व कर्णधारांनी वर्ल्ड कप 2023 च्या ट्रॉफीसोबत फोटोशूटही केलं. यादरम्यान रोहित शर्मा म्हणाला की, आता वेळ आली आहे की, संघानं खेळावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे.

विश्वचषकापूर्वी रोहित शर्मानं सांगितली मोठी गोष्ट : कॅप्टन डे कार्यक्रमादरम्यान रोहित शर्मा म्हणाला, 'मला माहित आहे की, आम्हाला फक्त खेळावर लक्ष केंद्रित करायचं आहे. मी विश्वचषकाबद्दल खूप उत्सुक आहे, पण मला माहित आहे की, तिथं खूप दडपण आहे. तुम्ही भारतात खेळा किंवा इतर कुठेही खेळा तुमच्यावर नेहमीच दडपण असतं. आमचं लक्ष एकावेळी एकाच सामन्यावर आहे.

एकाच सामन्यावर लक्ष केंद्रित करायचं : रोहित शर्मा पुढे म्हणाला, 'आम्हाला अपेक्षांबद्दल काळजी करण्याची गरज नाही. आम्ही कोणाशी खेळतोय याची काळजी करण्याची गरज नाही. आम्हाला एकावेळी एकाच सामन्यावर लक्ष केंद्रित करावं लागेल. एक संघ म्हणून आम्हाला काय करायचं आहे. आम्ही 8 तारखेला चेन्नईमध्ये सुरुवात करणार आहोत. आम्हाला या स्पर्धेत खेळल्या जाणार्‍या प्रत्येक सामन्याचं महत्त्व समजतं. त्यामुळं तुमचा खेळ अव्वल ठेवायला आवडेल.

घरच्या मैदानावर सामने खेळणार :आपल्या खेळाडूंनी दबावाशिवाय खेळावं, अशी रोहितची इच्छा आहे. त्याला आपल्या खेळाडूंना खुलेपणानं खेळू द्यायचं आहे. या विश्वचषकात भारत आपल्या घरच्या मैदानावर सामने खेळणार आहे. त्यामुळं 2023 च्या विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याची चाहत्यांची अपेक्षा आहे.

हेही वाचा -

  1. Sachin Tendulkar : शून्याची भीती प्रत्येक खेळाडूला वाटते; सचिन तेंडुलकरनं सांगितलं कारण...
  2. Cricket World Cup 2023 : विश्वचषकाच्या इतिहासातील अव्वल पाच क्षेत्ररक्षक कोण?
  3. ICC World Cup 2023 :विश्वचषकादरम्यान कडक सुरक्षा, खलिस्तान समर्थकांच्या नापाक कारवायांमुळं पोलीस सतर्क

ABOUT THE AUTHOR

...view details