महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Cricket World Cup २०२३ : आगामी सामन्यांमध्ये प्लेइंग ११ निवडणं भारतासाठी सोपं नाही, अश्विनला संधी मिळेल का? - team India playing 11 against Afghanistan

Cricket World Cup २०२३ : ऑस्ट्रेलियाविरुद्ध रविचंद्रन अश्विनच्या किफायतशीर स्पेलनंतर, आगामी सामन्यात प्लेइंग ११ निवडताना कोच राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांची चांगलीच दमछाक होणार आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात संघ व्यवस्थापन तीन फिरकीपटूंसोबत जाणार की एका फिरकी गोलंदाजाच्या जागी वेगवान गोलंदाज आणणार, हे पाहणं औत्सुक्याच ठरेल.

R Ashwin
R Ashwin

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 9, 2023, 10:37 PM IST

मुंबई Cricket World Cup २०२३ : ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलामीच्या सामन्यात शानदार विजय मिळवल्यानंतर भारताचा पुढील सामना ११ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर अफगाणिस्तानशी आहे. मात्र या सामन्यापूर्वी कोच राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांना एक वेगळीच समस्या भेडसावत आहे.

चेपॉकमध्ये भारत तीन फिरकीपटूंसह उतरला : रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेपॉकमध्ये भारत तीन फिरकीपटूंसह उतरला. या तिघांनीही कांगारूंना २०० धावांच्या आत रोखण्यात महत्वपूर्ण योगदान दिलं. चेपॉकची खेळपट्टी फलंदाजीसाठी कठीण होती. विराट कोहली (७३.२८) आणि केएल राहुल (८४.३५) यांचा स्ट्राईक रेट याचा पुरावा आहे. दुसरीकडे, भारतातील विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाची टीम अ‍ॅडम झाम्पा या एकाच स्पेशालिस्ट फिरकीपटूसह आली आहे. त्यामुळे विश्वचषकातील आगामी सामन्यात त्यांची कोंडी होऊ शकते.

पहिल्या सामन्यात तिन्ही फिरकीपटूंची दमदार कामगिरी : अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनचा निर्णय घेणं टीम इंडियासाठी खूप कठीण असेल. पहिल्या सामन्यात रविचंद्रन अश्विन (१-३४), कुलदीप यादव (२-४२) आणि फिरकी अष्टपैलू रवींद्र जडेजा (३-२८) यांनी दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये टीम निवडताना संघाच्या थिंक टँकला फार विचार करावा लागेल.

दिल्लीत फलंदाजांवर मदार : कोटलाच्या मैदानावर टीम इंडिया आपल्या संघात कोणताही बदल न करता खेळली तरी फारसा फरक पडणार नाही. दक्षिण आफ्रिकेनं अलीकडेच श्रीलंकेविरुद्ध दिल्लीत मोठी धावसंख्या उभारली होती. या सामन्यातही मोठी धावसंख्या उभारण्याची मदार फलंदाजांवर असेल. मात्र त्यानंतर अहमदाबादमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याची परिस्थिती लक्षात घेता प्लेइंग ११ चा निर्णय घेणं कठीण जाणार आहे.

जडेजा, कुलदीपला वगळणं शक्य नाही : विश्वचषकातील आगामी सामन्यांसाठी ३७ वर्षीय अश्विनला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्याची दोन कारणं आहेत. सर्वप्रथम, देशातील इतर कोणत्याही मैदानावर चेपॉकच्या विकेटइतकी संथ आणि टर्न घेणारी विकेट मिळण्याची शक्यता नाही. म्हणूनच आगामी सामन्यांमध्ये तीन फिरकीपटूंसह मैदानात उतरणं मेन इन ब्लूला शक्य होणार नाही. जर प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन फिरकीपटूंचा समावेश केला, तर रवींद्र जडेजाच्या फलंदाजीच्या क्षमतेमुळे त्याची निवड केली जाईल. तसेच कुलदीप यादवची अपारंपरिक गोलंदाजीची शैली हा त्याचा प्लस पॉइंट आहे. त्यामुळे त्याच्या फिरकीची संघाला आवश्यकता असेल. विशेष म्हणजे, विरोधी फलंदाजांना कुलदीपचे चेंडू वाचता येत नाहीत. मात्र ४८९ कसोटी आणि १५६ एकदिवसीय विकेट्स घेणारा अश्विन अजूनही असा खेळाडू आहे, ज्याचा आगामी सामन्यांसाठी निश्चितच विचार केला जाईल.

हेही वाचा :

  1. Cricket World Cup 2023 : 'भावानं सर्वोत्तम कामगिरी करून विश्वचषक जिंकवून द्यावा'; रविंद्र जडेजाच्या बहिणीची 'ETV भारत'शी खास बातचीत
  2. Cricket World Cup २०२३ : 'आमचे फलंदाज अपयशी ठरले', भारताविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर स्टीव्ह स्मिथची कबुली
  3. Cricket World Cup २०२३ : वर्ल्डकपमध्ये डेव्हिड वॉर्नरचा विश्वविक्रम, सचिन, डिव्हिलियर्सला मागं टाकलं

ABOUT THE AUTHOR

...view details