इशान किशनच्या आई-वडिलांशी खास बातचित पाटणा (बिहार) : बिहार आणि यष्टीरक्षक फलंदाज यांचं नातं जुनं आहे. बिहारच्या एका यष्टीरक्षक फलंदाजानं भारतीय क्रिकेटमध्ये किती मोठं योगदान दिलं, हे आपण सर्वच जाणतो. यावेळचा विश्वचषकही बिहारसाठी खास आहे. बिहारची राजधानी पाटणा येथील रहिवासी असलेल्या यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनचा या स्पर्धेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आलाय.
इशान प्रत्येक पोझिशनवर खेळू शकतो : इशान किशन त्याचे आई-वडील, भाऊ आणि मेहुणीसह संयुक्त कुटुंबात राहतो. यावेळी इशान किशन केवळ चांगली कामगिरी करणार नाही तर भारत १९ नोव्हेंबरला विश्वचषक ट्रॉफीही उंचावेल, अशी या सर्वांना आशा आहे. जेव्हा इशान किशनचे वडील प्रणव पांडे यांना, इशाननं कुठं फलंदाजी करावी? असं विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी इशान किशनमध्ये खूप प्रतिभा आहे. तो कुठेही फलंदाजी करू शकतो, असं सांगितलं.
पाकिस्तानविरुद्ध मधल्या फळीत इशाननं चांगली कामगिरी केली होती. त्यानं केएल राहुलसोबत उत्तम भागीदारी रचली. सलामी असो किंवा मधल्या फळीतील फलंदाजी, तो कुठेही आणि कोणत्याही परिस्थितीत चांगलं खेळू शकतो. आयपीएलमध्ये देखील इशान किशननं मधल्या फळीत चांगली कामगिरी केली आहे. - प्रणव पांडे, इशान किशनचे वडील
दुसरं द्विशतक केव्हा झळकावणार : इशान किशन दुसरं द्विशतक केव्हा झळकावणार या प्रश्नावर प्रणव पांडे म्हणाले की, तो कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करतो आणि त्याला किती संधी मिळते यावर ते अवलंबून आहे. 'हे सर्व परिस्थितीवर अवलंबून आहे. जर इशान मधल्या फळीत फलंदाजी करत असेल, तर तो कधी फलंदाजी करतो. तेव्हा किती षटकं संपली आणि किती षटकं शिल्लक असतील. तसेच तेव्हा स्कोअर किती आहे, या सर्व गोष्टी पाहाव्या लागतात. यावर ते अवलंबून असते', असं ते म्हणाले.
इशान-राहुल दोघंही चांगले खेळत आहेत : इशान किशन आणि केएल राहुल यांच्यातील तुलनेबद्दल विचारलं असता, प्रणव पांडे म्हणाले की, 'तुलना नेहमीच होत आली आहे. एकेकाळी सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांची तुलना केली जायची. आताही इशान किशन आणि केएल राहुलची तुलना केली जाते. कधी कधी इशान किशनची दुसऱ्या कोणाशी तरी तुलना होते. हे सर्व परिस्थितीवर अवलंबून असते. आत्ताच काही सांगता येत नाही. दोघंही चांगली कामगिरी करत आहेत. दोघंही चांगलं खेळत आहेत. इशान किंवा केएल राहुलचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश परिस्थितीवर अवलंबून आहे', असं त्यांनी नमूद केलं.
इशान कुटुंबाचा खूप विचार करतो : प्रणव पांडे पुढं म्हणाले की, इशान किशन खूप काळजी घेणारा मुलगा आहे. तो त्याच्या कुटुंबाचा विचार करतो. एक वडील म्हणून मला नेहमीच वाटतं की, जेव्हा तो खेळायला येतो तेव्हा त्यानं चांगली कामगिरी करावी. मला कधीच वाटलं नव्हतं की इशान किशन इतका मोठा क्रिकेटपटू होईल. मला फक्त त्यानं रणजी ट्रॉफी खेळावी, नोकरी मिळवावी आणि जीवनात स्थिर व्हावं, असंच वाटायचं, असं ते म्हणाले.
अभ्यासापुढं क्रिकेटची निवड : लहानपणी जेव्हा इशान किशनला क्रिकेट की अभ्यास यापैकी एक निवडण्यास सांगितलं होतं, तेव्हा तो शाळेत वेळ घालवण्यास उत्सुक नव्हता. त्याच्या हजेरीबाबत अनेक समस्या होत्या. इशान सतत क्रिकेट खेळत असे. तेव्हा तो १६ वर्षांखालील गटात खेळत होता. त्यानंतर जेव्हा शाळेनं त्याला अभ्यास किंवा क्रिकेट यापैकी एक निवडण्यास सांगितलं, तेव्हा त्यानं क्रिकेटची निवड केली. याला त्याच्या घरच्यांनी पूर्ण पाठिंबा दिला. त्यानंतर इशाननं हायस्कूल शिक्षण दुसऱ्या शाळेत पूर्ण केलं.
मुलाला टीव्हीवर पाहून बरं वाटतं : इशान किशनची आई सुचित्रा सिंह सांगतात की, जेव्हा ती आपल्या मुलाला टीव्हीवर पाहते, तेव्हा तिला खूप बरं वाटतं. मी त्याच्याशी खेळ सोडून इतर सर्व गोष्टींबद्दल बोलते. मला त्याच्या तब्येतीची काळजी वाटते, असं त्यांनी सांगितलं. सुचित्रा सिंह पुढं सांगतात की, आजकाल त्या त्यांच्या मुलाला वारंवार भेटत नाही, कारण तो टीमसोबत फिरत असतो. जेव्हा तो मुंबईत जास्त दिवस असतो, तेव्हा तो आम्हाला तिथं बोलावतो, असं त्यांनी सांगितलं.
इशान किशन लग्न कधी करणार : इशानच्या लग्नाच्या प्लॅन्सबद्दल विचारलं असता, त्याच्या आईनं सांगितलं की, इशानला सध्या त्याच्या खेळावर लक्ष केंद्रित करायचंय. लग्नाची सध्या घाई नाही. त्यानं त्याच्या खेळावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. लग्न जिथं करायचं आहे तिथेच होईल, असं त्या म्हणाल्या. सुचित्रा सिंह सांगतात की, इशान किशनचा आवडता पदार्थ 'आलू पराठा, दही आणि साखर आहे. याशिवाय, त्याला घरची बनवलेली पनीर चिलीही आवडते. जितके दिवस तो पाटण्यात असतो, तितके दिवस तो मी बनवलेले पदार्थचं खातो, असं त्यांनी सांगितलं. शेवटी, वडिलांप्रमाणेच, इशान किशनच्या आईनंही भारत विश्वचषक जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला.
हेही वाचा :
- Cricket World Cup 2023 : 'भारत उपांत्य फेरीत नक्कीच प्रवेश करणार', किरण मोरेंची भविष्यवाणी
- Cricket World Cup 2023 : अश्विन-अक्षर चर्चेत संदीप पाटील यांची उडी, उपांत्य फेरीचंही केलं भाकित