महाराष्ट्र

maharashtra

Shubman Gill News : शुभमन गिलला रुग्णालयातून डिस्चार्ज, भारत-पाकिस्तान सामन्यात खेळणार का?

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 10, 2023, 1:17 PM IST

Shubman Gill News भारतीय क्रिकेट संघाची चिंता वाढविणारी बातमी आहे. आजारी असलेल्या शुभमन गिलला रुग्णालयातून सुट्टी मिळालीय. असे असले तरी १४ ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान सामन्यात शुभमन खेळण्याबाबत साशंकता आहेत. शुभमन गिल हा तापानं फणफणल्यानंतर त्याला ऑस्ट्रेलियासोबतच्या सामन्यात खेळता आले नव्हते.

Shubman Gill News
Shubman Gill News

हैदराबादShubman Gill News -भारताचा आघाडीचा फलंदाज शुभमन गिल हा ताप आल्यानं आजारी होता. उपचारासाठी त्याला मल्टी-स्पेशलिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कारण, त्याच्या प्लेटलेटची संख्या कमी झाली होती. बरे झाल्यानं त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

गिल हा चेन्नईमधील हॉटेलात परतला आहे. गिल हा भारताचा भरवशाचा फलंदाज आहे. भारत-ऑस्ट्रिलया सामना होण्यापूर्वी शुभमनला ताप आला होता. पंजाबचा हा खेळाडू ११ ऑक्टोबरला होणाऱ्या दिल्लीतील अफगाणिस्तानविरोधातील सामन्यातही खेळू शकला नाही. त्याच्या प्लेटलेटची संख्या ७५ हजार झाल्यानं चेन्नईच्या कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याच्या प्लेटलेटची संख्या १ लाखांहून अधिक झाल्यानं प्रकृती स्थिर झाली आहे.

शुभमनची फलंदाजी पाहण्याची चाहत्यांना प्रतिक्षा-अहमदाबादमध्ये भारत-पाकिस्तानचा खेळल्या जाणाऱ्या सामन्याविषयी सर्व क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता आहे. अशा स्थितीतही शुभमन गिल पाकिस्तानच्या विरोधात खेळण्याबाबत साशंकता आहे. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी मंगळवारी माध्यमांशी सांगितले की, डॉक्टरांची टीम शुभमनची तपासणी करत आहेत. तडाखेबंद फलंदाजीमुळे शुभमन हा क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. त्यामुळे शुभमनची फलंदाजी पाहण्याची क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा आहे. शुभमन गिल हा संघाबाहेर राहिल्यास पाकिस्तानबरोबरील सामन्यात भारतीय संघासमोर मोठे आव्हान निर्माण होऊ शकते.

2023 मध्ये सर्वाधिक धावा करणारा ठरला फलंदाज-शुभमन गिलनं खराब फॉर्मवर मात कामगिरीत सुधारणा केलीय. 2023 मध्ये आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा शुभमन गिल हा खेळाडू आहे. गिलनं या बाबतीत विराट कोहलीलाही मागे टाकले आहे. 2023 मध्ये गिलने 26 सामन्यांच्या 29 डावांमध्ये 46.07 च्या सरासरीनं 1198 धावा करून दबदबा निर्माण केला. या कालावधीत त्याने 4 शतके आणि 2 अर्धशतके ठोकली आहेत. तर 2023 मध्ये विराटनं आतापर्यंत 17 सामन्यांच्या 19 डावांमध्ये 4 शतके आणि 2 अर्धशतकांच्या मदतीने 984 धावांचा विक्रम रचला आहे. या काळात त्याची धावांची सरासरी ५४.६६ राहिली आहे. तो यादीत 7 व्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा-

  1. Cricket World Cup 2023 : शुभमन गिलबाबत कर्णधार रोहित शर्माचं 'मोठं' वक्तव्य

ABOUT THE AUTHOR

...view details