चेन्नई Cricket World Cup 2023:भारतीय संघ 8 ऑक्टोबरला म्हणजेच रविवारी विश्वचषकात पहिला सामना खेळणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक) होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात खेळपट्टीची (पीच) भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. भारताचे दोन्ही सराव सामने पावसामुळं रद्द झाले आहेत. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला सराव सामन्यात खेळण्याची संधी मिळालेली नाही.
खेळपट्टीची पाहणी :भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील रविवारच्या विश्वचषक सामन्यासाठी वापरल्या जाणार्या चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळपट्टीवरील गवत काढून टाकल्यानंतर खेळपट्टी तपकिरी रंगाची दिसत आहे. या खेळपट्टीला दोन दिवस झाकून ठेवण्यात आलं होतं. दिवसभर 29-30 अंश तापमान असल्यास खेळपट्टीला तडा जाण्याची शक्याता वर्तवण्यात येत आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा तसंच टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी शुक्रवारी संध्याकाळी खेळपट्टीची पाहणी केलीय.
खेळपट्टी फिरकीपटूंसाठी अनुकूल :संध्याकाळी, खेळपट्टीवर असलेलं जाड कव्हर काढून टाकल्यानंतर, एक हलका रोलर त्यावर फिरवण्यात आलाय. मात्र, यावेळी पाण्याचा वापर करण्यात आलेला नाही. परिस्थिती तशीच राहिल्यास खेळपट्टी फिरकीपटूंसाठी अनुकूल राहण्याची शक्यता आहे. प्रशिक्षण सत्रादरम्यान, अंतिम विश्वचषक संघात अक्षर पटेलची जागा घेणारा रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, इशान किशन, विराट कोहली यांना मुख्य प्रशिक्षक द्रविड यांनी मार्गदर्शन केलं.
चेन्नईच्या स्टेडियमबाहेर दर्शकांच्या रांगा : चेपॉक येथे 8 ऑक्टोबरला भारत ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिला सामना होईल. गतविजेता इंग्लंड, उपविजेता न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात नरेंद्र मोदी स्टेडियम (मोटेरा) म्हणून ओळखलं जाणारं स्टेडियम खुर्च्या रिकाम्या होत्या. या सामन्यासाठी 40 हजाराहून अधिक दर्शकांची उपस्थिती होती, हे आयसीसीला रेटून सांगावं लागलं. मात्र, चेन्नईच्या स्टेडियमबाबत अशी कोणतीही परिस्थिती सध्या दिसत नाही. सध्या स्टेडियमबाहेर चाहत्यांच्या लांबलचक रांगा बघायला मिळत आहेत. या खेळपट्टीवर अनिल कुंबळेनं सर्वाधिक 48 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर हरभजन सिंगनं 42 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळं एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक) भारतीय संघासाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.
हेही वाचा -
- Cricket World Cup 2023 : भारतच विश्वचषकाचा दावेदार, 'या' युवा खेळाडूची विश्वचषकात मोठी कामगिरी
- World Cup २०२३ : शुभमन गिलच्या जागी 'या' खेळाडूला मिळणार संधी? राहुल द्रविड यांचा गिलबाबत मोठा खुलासा
- Asian Games २०२३ : आशियाई गेम्समध्ये भारताला सुवर्णपदक, उपमुख्यमंत्र्यांनी साधला 'चँपियन'च्या आई-वडिलांशी संवाद