हैदराबाद :क्रिकेट विश्वचषकाच्या ६ व्या सामन्यात आज न्यूझीलंड समोर नेदरलॅंडचं आव्हान होतं. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना झाला. नेदरलॅंडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सनं टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. नेदरलॅंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडनं ५० षटकांत ३२२-७ धावा केल्य. न्यूझीलंडकडून विल यंगनं ८० चेंडूत सर्वाधिक ७० धावा केल्या. रचिन रवींद्रनं ५१ तर कर्णधार टॉम लॅथमनं ४६ चेंडूत ५३ धावा ठोकल्या. नेदरलॅंडकडून आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन आणि रोएलॉफ व्हॅन डर मर्वेनं प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या.
मिचेल सँटनरची धारदार गोलंदाजी :प्रत्युत्तरात नेदरलॅंडचा संघ ४६.४ षटकांत सर्वबाद २२३ धावाचं करू शकला. नेदरलॅंडकडून कॉलिन अकरमननं ७३ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीनं सर्वाधिक ६९ धावा केल्या. कर्णधार एडवर्ड्सनं ३० तर एंजेलब्रेक्टनं २९ धावांचं योगदान दिलं. न्यूझीलंडकडून मिचेल सँटनरनं धारदार गोलंदाजी केली. त्यानं १० षटकांत ५९ धावा देत सर्वाधिक ५ बळी घेतले.
विल यंगचं अर्धशतक : प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवे ४० चेंडूत ३२ धावा करून बाद झाला. त्याला व्हॅन डर मर्वेनं बास डी लीडच्या हाती झेलबाद केलं. एका बाजूनं विल यंगनं चांगली फलंदाज केली. तो ८० चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीनं ७० धावा करून बाद झाला. व्हॅन मीकरेननं त्याची विकेट घेतली. त्यानंतर फॉर्ममध्ये असलेल्या रचिन रवींद्रनं पुन्हा एकदा अर्धशतकीय खेळी केली. त्याला ५१ च्या स्कोरवर व्हॅन डर मर्वेनं झेलबाद केलं.
दोन्ही संघाची प्लेइंग ११ :