हैदराबादCricket World Cup 2023 :विश्वचषक 2023 सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्ल्क आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गतविजेता इंग्लंड, न्यूझीलंड यांच्यात उद्या पहिला सामना होणार आहे. भारत 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. सर्व संघ ट्रॉफी जिंकण्यासाठी जोरदार तयारीला लागले आहेत. सामन्यादरम्यान फलंदाज, गोलंदाजांसोबत क्षेत्ररक्षकही महत्त्वाची भूमिका बजावतात. आज आम्ही तुम्हाला या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या इतिहासातील महत्वाच्या पहिल्या पाच क्षेत्ररक्षक खेळाडूबद्दल सांगणार आहोत.
रिकी पाँटिंग : क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासातील टॉप-फाइव्ह क्षेत्ररक्षकांबद्दल बोलायचे तर, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगचं नाव या यादीत पहिल्या नंबरवर येत. पॉन्टिंगनं 1996 ते 2011 या कालावधीत विश्वचषक स्पर्धेत 46 सामन्यांमध्ये भाग घेतला होता. ज्यामध्ये त्यानं 28 कॅच घेतल्या आहेत. रिकी पाँटिंगनं एका सामन्यात सर्वाधिक तीन झेल घेतले आहेत. विश्वचषकात पॉन्टिंगची प्रत्येक सामन्यात झेल घेण्याची सरासरी 0.608 आहे.
जो रूट :विश्वचषकातील पहिल्या पाच क्षेत्ररक्षकांच्या यादीत इंग्लंडचा खेळाडू जो रुटचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. रूटनं 2015, 2019 मध्ये दोन एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भाग घेतला आहे. ज्यामध्ये त्यानं 17 सामन्यांमध्ये 20 कॅच घेतल्या होत्या. रूटनं एका सामन्यात सर्वाधिक तीन कॅच घेतल्या आहेत. जो रूटची एका सामन्यात कॅच घेण्याची सरासरी 1.176 आहे.