चेन्नई : रविवारी एमए चिदंबरम स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया समाना खेळला जाणार आहे. मात्र, एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापूर्वी सलामीवीर शुभमन गिल आजारी पडलाय. याबाबत भारताचा कर्णधार रोहित शर्मानं वक्तव्य केलंय. शुभमन गिलला आजारातून बरं होण्याची प्रत्येक संधी संघ देईल. शुभमन गिल अजूनही संघाचा भाग आहे. त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या समान्यातून वगळण्यात आलेलं नाहीये, असं रोहित शर्मा म्हणाला.
गिलला डेंग्यू ची लागण : संघ चेन्नईत आल्यापासून गिलनं संघाच्या सराव सत्रात भाग घेतला नाही. शुक्रवारी गिलला डेंग्यू झाल्याचं समोर आलं होतं. सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत रोहित शर्मा म्हणाला, सर्वजण तंदुरुस्त आहेत, पण गिल शंभर टक्के बरा नाहीये. तो अजारी जरी असला तरी, संघात कोणतीही कमी नाही. त्याची प्रकृती ठीक नसल्यामुळं आम्ही दररोज त्याच्यावर नजर ठेवत आहोत. आम्ही त्याला सावरण्याची प्रत्येक संधी देणार आहेत. त्याला बरं वाटत असल्यास नक्की विचार केला जाईल असं शर्मा म्हणाला. गिल भारतीय संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या वर्षी एकदिवसीय सामन्यांमध्ये धावसंख्येच्या यादीत गिल आघाडीवर आहे. त्यानं 20 सामन्यांमध्ये 72.35 च्या सरासरीनं, 105.03 च्या स्ट्राइक रेटनं 1230 धावा केल्या आहेत.
गिल लवकरच बरा होईल : पुढे बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, गिल बरा व्हावा अशी, माझी इच्छा आहे. एक कर्णधार म्हणून मी, असा विचार करत नाही की गिलनं खेळायलाच हवं. त्यानं बरं व्हावं, संघातील कोणीही आजारी पडू नये असं माला वाटतं. गिल तरुण युवा खेळाडू आहे, त्याचं शरीर तंदुरुस्त आहे, तो लवकरच बरा होईल अशी अपेक्षा आहे.