अहमदाबाद Cricket World Cup 2023 ENG vs NZ : न्यूझीलंडनं ODI विश्वचषक 2023 च्या सलामीच्या सामन्यात इंग्लंडचा पराभव केला. यासह, न्यूझीलंड संघानं विश्वचषकाला धमाकेदार सुरुवात केली आहे. या विजयासह संघानं विश्वचषक 2019 विश्वचषक फायनलमधील पराभवाचा बदला घेतला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर नाणेफेक गमावल्यानंतर इंग्लंडनं प्रथम फलंदाजी करताना 9 गडी गमावून 282 धावा केल्या. संघाकडून जो रूटनं 86 चेंडूत 77 धावा केल्या. कर्णधार जोस बटलरनं 43, जॉनी बेअरस्टोनं 33 धावा केल्या. न्यूझीलंडकडून वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीनं सर्वाधिक ३ बळी घेतले. तर मिचेल सँटनर, ग्लेन फिलिप्सनं प्रत्येकी 2 बळी घेतले.
रचिनस कॉनवे यांची 273 धावांची भागीदारी :283 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडनं 36.2 षटकात 1 गडी गमावून सामना जिंकला. न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवे, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला रचिन रवींद्र यांनी कमाल केली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 273 धावांची नाबाद भागीदारी केली. कॉनवेनं 121 चेंडूत नाबाद 152 धावा केल्या. रचिननं 96 चेंडूत नाबाद 123 धावा केल्या. कॉनवेनं आपल्या खेळीत 19 चौकार, 3 षटकार ठोकले. रचिननं 11 चौकार, 5 षटकार मारले. दोघांच्या आक्रमक फलंदाजीसमोर इंग्लंडचे गोलंदाज हतबल दिसत होते. इंग्लंडकडून फक्त सॅम कुरननं एक विकेट घेतली.
इंग्लंडसाठी जो रूट टॉप स्कोअरर : नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं 50 षटकात 9 गडी गमावून 282 धावा केल्या. इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटनं सर्वाधिक 77 धावा केल्या. त्याच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला 50 धावांचा टप्पा गाठता आला नाही. कर्णधार जोस बटलरनं 43 धावा केल्या. जॉनी बेअरस्टोनं 33, हॅरी ब्रूकने 25, लियाम लिव्हिंगस्टोननं 20 धावा केल्या. आदिल रशीदनं नाबाद 15, डेव्हिड मलान, सॅम करननं प्रत्येकी 14, तर मार्क वुडनं नाबाद 13, मोईन अली, ख्रिस वोक्सने प्रत्येकी 11 धावा केल्या.
मॅट हेन्रीनं घेतले तीन बळी : या सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना लोळवलंय. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी इंग्लंडच्या संघाला जोरदार धुतलं. वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीनं सर्वाधिक 3 बळी घेतले. फिरकीपटू मिचेल सँटनर, ग्लेन फिलिप्स यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. ट्रेंट बोल्ट, रचिन रवींद्रनं प्रत्येकी एक विकेट घेतली.
- 20:14 ऑक्टोबर 05
ENG Vs NZ Live Updates: रचिन रवींद्रचं ODI मध्ये पहिलं शतक
न्यूझीलंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्रनं त्याच्या क्रिकेट विश्वचषक पदार्पणाच्या सामन्यात पहिलं शतक झळकावलं. रचिननं केवळ 82 चेंडूंचा सामना करत पहिलं एकदिवसीय शतक झळकावलं. या खेळीत त्यानं 9 चौकार, 4 षटकार ठोकलाय.
20:06 ऑक्टोबर 05
ENG Vs NZ Live Updates: डेव्हॉन कॉनवेनं नं शतक ठोकलं
न्यूझीलंडचा स्टार सलामीवीर फलंदाज डेव्हॉन कॉनवेनं क्रिकेट विश्वचषक 2023 चं पहिलं शतक झळकावलंय. कॉनवे सामन्याच्या सुरुवातीपासूनच जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. कॉनवेनं 83 चेंडूंचा सामना करत शतक पूर्ण केलंय. या स्फोटक खेळीत कॉनवेनं आतापर्यंत 13 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत.
- 7 : 19 ऑक्टोबर 05
न्यूझीलंडच्या 100 धावा पूर्ण :
न्यूझीलंडनं 100 धावा पूर्ण केल्या आहेत. रचिन रवींद्र आणि डेव्हन कॉनवे यांनी आपापलं अर्धशतक पूर्ण केलंय. या दोन्ही खेळाडूंचं विश्वचषकातील हे पहिलंच अर्धशतक आहे. न्यूझीलंडनं 13 षटकात 107 धावा केल्या आहेत. रचिन 55 तर कॉनवे 51 धावांवर खेळत आहे.
18:52 ऑक्टोबर 05
ENG vs NZ Live Updates: इंग्लंडनं दिलेल्या 284 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंड संघाची सुरुवात चांगली झाली आहे. 10 षटकांअखेर न्यूझीलंडनं 1 गडी गमावला आहे. रचिन रवींद्र (47) आणि डेव्हॉन कॉनवे (33) धावा केल्यानंतर मैदानावर खेळत आहेत.
- 18:14 ऑक्टोबर 05
न्यूझीलंडला पहिला धक्का :ENG vs NZ Live Updates: दुसऱ्या षटकात न्यूझीलंडला पहिला धक्का बसला. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज सॅम कुरननं दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर न्यूझीलंडचा सलामीवीर विल यंगला बाद केलंय.
- इंग्लंडनं दिलं 282 धावाचं लक्ष : क्रिकेट विश्वचषकाचा पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेकनंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं 50 षटकात 9 गडी बाद 282 धावा केल्या.
- 17:16 ऑक्टोबर 05