नवी दिल्ली - भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला हरवून विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील पहिलाच विजय मिळवला. या सामन्यामध्ये धोनीने वापरलेल्या ग्लोजचा वाद मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला आहे. आयसीसीने दिलेल्या आदेशाबाबत बीसीसीआयच्या प्रशासकांची प्रतिक्रिया आली आहे.
धोनीच्या ग्लोज प्रकरणावर विनोद राय यांनी दिले 'हे' उत्तर - worldcup 2019
भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला हरवून विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील पहिलाच विजय मिळवला. या सामन्यामध्ये धोनीने वापरलेल्या ग्लोजचा वाद मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला आहे.

आम्ही याप्रकरणाबाबत आयसीसीकडे परवानगी मागितली असून प्रशासकीय समितीच्या बैठकीनंतर याबाबत सविस्तर माहिती देऊ, अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे प्रशासक विनोद राय यांनी दिली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात धोनीने पॅरा कमांडोजच्या पॅराशूट युनिटकडे असलेले विशेष ‘बलिदान’ चिन्ह असलेले ग्लोव्ह्ज वापरले होते. या चिन्हाला ‘बलिदान चिन्ह’ असे म्हटले जाते, पॅरा कमांडोजच्या सदस्यांना हे चिन्ह वापरण्याची परवानगी मिळते. मात्र, धोनीच्या ग्लोजवर असणारे हे चिन्ह काढून टाकावे असे आदेश आयसीसीने दिले आहेत.