लंडन- आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाला दुखापतीचे ग्रहण लागले आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला फार्मात असलेला भारतीय सलामीवीर शिखर धवनला दुखापत झाली. त्यामुळे त्याला संपूर्ण स्पर्धेला मुकावे लागले. त्यानंतर पाकिस्तान विरुध्दच्या सामन्यात भुवनेश्ववर कुमारचे स्नायू दुखावले. त्यामुळे तो सामन्यात गोलंदाजी करु शकला नाही. आता अष्टपैलू विजय शंकरला दुखापत झाली आहे. याकारणाने तो स्पर्धेत खेळू शकणार नाही.
CRICKET WC : शिखर धवननंतर विजय शंकर विश्वकरंडक स्पर्धेतून बाहेर; 'या' खेळाडूंची संघात वर्णी - mayank agarwal
शंकरच्या बदली फलंदाज मयंक अगरवालला संधी मिळाली आहे.
![CRICKET WC : शिखर धवननंतर विजय शंकर विश्वकरंडक स्पर्धेतून बाहेर; 'या' खेळाडूंची संघात वर्णी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3712570-1108-3712570-1561970724523.jpg)
नेट सराव करताना बुमराहच्या एका वेगवान चेंडूने अष्टपैलू विजय शंकरला पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली. याकारणाने शंकर अफगाणिस्तान विरुध्दचा सामना खेळू शकला नाही. मात्र आता शंकरची दुखापत गंभीर असून यामुळे शंकरला संपूर्ण स्पर्धेसाठी मुकावे लागले आहे. शंकरच्या ठिकाणी मयंक अगरवाल संघात संधी देण्यात आली आहे. मयंक अगरवाल संघात सामिल होण्यासाठी इंग्लंडला बोलवण्यात आले आहे.
शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्यानंतर विजय शंकरला संघात संधी देण्यात आली. मात्र, शंकरला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. यामुळे त्याच्या संघात करण्यात आलेल्या सामावेशावर मोठ्या प्रमाणत टीका करण्यात येत आहे.