महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

CRICKET WC : न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट ठरला पहिला हॅट्ट्रिकवीर ज्याने... - hat-trick

ट्रेंट बोल्टने हॅट्ट्रिक तर घेतलीच पण त्याचबरोबर तो विश्वकरंडक स्पर्धेत न्यूझीलंडकडून हॅट्ट्रिक घेणारा पहिलाच गोलंदाज ठरला.

बोल्ट

By

Published : Jun 30, 2019, 1:59 PM IST

Updated : Jul 1, 2019, 11:47 AM IST

लंडन - लॉर्ड्सच्या मैदानावर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर ८६ धावांनी मात केली. या सामन्यात दोन्ही संघाच्या गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने न्यूझीलंडचा निम्मा संघ गारद केला तर, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने हॅट्ट्रिकसह ४ बळी मिळवत ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले.

ट्रेंट बोल्टने हॅट्ट्रिक तर घेतलीच पण त्याचबरोबर तो विश्वकरंडक स्पर्धेत न्यूझीलंडकडून हॅट्ट्रिक घेणारा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. या हॅट्ट्रिकमध्ये बोल्टने ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजा, मिचेल स्टार्क आणि जेसन बेहरेनडॉर्फ यांना माघारी धाडले.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या २४४ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघाने १५७ धावांपर्यंतच मजल मारली. ऑस्ट्रेलियाने हा सामना मिशेल स्टार्क आणि जेसन बेहरनडॉर्फने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर जिंकला.

Last Updated : Jul 1, 2019, 11:47 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details