टोकियो -तीनवेळा विश्वविजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला १-० च्या फरकाने पराभूत करुन भारतीय संघाने उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. ४१ वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारतीय महिला संघाने ऑलिम्पिकमध्ये इतकी चमकदार कामगिरी केली आहे. टोकियो ऑलिम्पिकमधील ओई हॉकी स्टेडियम नॉर्थ पिच येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला हरवून भारताने उपांत्य फेरीच्या सामन्यात आगेकूच केली.
गुरजीत कौर निर्णायक गोल -
दुसऱ्या क्वार्टरमध्ये गुरजीत कौरने पेनल्टी कॉर्नरवर केलेल्या गोलमुळे राणी रामपालच्या नेतृत्वाखालील संघाला धार मिळाली होती. तोच गुरजीत कौर हिने केलेला एकमेव गोल भारतासाठी निर्णायक ठरला आहे.