कराची -यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेत निराशाजनक कामगिरी करणाऱ्या पाकिस्तानच्या संघात मोठे बदल घडण्याची शक्यता आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड या महिन्याच्या शेवटी एक बैठक बोलवणार असून या बैठकीत पाकिस्तानचा नवा कर्णधार आणि नवीन प्रशिक्षक नेमले जाऊ शकतात.
पाकच्या संघासाठी नवीन कर्णधार नेमण्याची शक्यता - new captain
बोर्डाने या बैठकीची तारीख स्पष्ट केली नसली तरी सूत्रांच्या मते 29 जुलैला ही बैठक होऊ शकते.
बोर्डाने या बैठकीची तारीख स्पष्ट केली नसली तरी सूत्रांच्या मते 29 जुलैला ही बैठक होऊ शकते. पाकिस्तानचा माजी खेळाडू आणि क्रिकेट समितीचा सदस्य मिसबाह उल हक वैयक्तिक कारणामुळे अमेरिकेला जाणार आहे. त्याने सांगितले की, जर मी परदेशात गेलो तर तो व्हिडिओ लिंक द्वारे या बैठकीत भाग घेऊ शकतो.
या बैठकीत वसीम अक्रम, आणि पाकिस्तानच्या महिला संघाच्या कर्णधार उरुज मुमताज उपस्थित असणार आहेत. यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तान पाचव्या स्थानावर होता. या बैठकीत संघाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाणार आहेत.