महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

टी 20 वर्ल्डकपचा थरार मल्टिप्लेक्समध्ये अनुभवता येणार - भारत पाकिस्तान पहिला सामना

मल्टिप्लेक्समध्ये आता टी 20 वर्ल्डकपचा थरार अनुभवता येणार आहे. आयसीसी टी 20 स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे. मल्टिप्लेक्स थिएटर्सने याबाबत एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्यामध्ये सांगण्यात आलं आहे की, भारतीय संघाचे सर्व सामने आयनॉक्सच्या थिएटर्समध्ये दाखवण्यात येणार आहेत.

टी 20 वर्ल्डकपचा थरार
टी 20 वर्ल्डकपचा थरार

By

Published : Oct 21, 2021, 7:39 PM IST

Updated : Oct 27, 2021, 7:13 AM IST

पुणे - मल्टिप्लेक्समध्ये आता टी 20 वर्ल्डकपचा थरार अनुभवता येणार आहे. आयसीसी टी 20 स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे. मल्टिप्लेक्स थिएटर्सने याबाबत एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्यामध्ये सांगण्यात आलं आहे की, भारतीय संघाचे सर्व सामने आयनॉक्सच्या थिएटर्समध्ये दाखवण्यात येणार आहेत.

तिकीट दर 500 ते 1000 रुपये

भारतातील क्रिकेटचे वेड लक्षात घेता हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर क्रिकेटचे सामने पाहता येणार आहेत. तसेच या दरम्यान थिएटर्समध्ये मिळणाऱ्या खाद्य पदार्थांचाही अनुभव घेता येणार आहे. या दरम्यान कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करण्याचा निर्णय आयनॉक्सने घेतला आहे. या मल्टिप्लेक्स थीएटरमध्ये सामने पाहण्यासाठी वेगवेगळ्या शहरात वेगवेगळे तिकीट दर आकारण्यात येणार आहेत. पुणे शहरात हा तिकीट दर 500 रुपये ते 1000 रुपये इतका असेल.

भारत पाकिस्तान पहिला सामना

भारतीय संघ 24 ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरोधात टी20 वर्ल्ड कपचा पहिला सामना खेळणार आहे. जवळपास दोन वर्षानंतर पाकिस्तान आणि भारताचा क्रिकेट संघ आमने- सामने येणार आहे. त्यानंतर भारत 31 ऑक्टोबर रोजी दुबईमध्ये न्यूझीलंडच्या विरोधात सामना खेळेल. त्यानंतर 3 नोव्हेंबर रोजी अबूधाबीमध्ये टीम इंडियाचा सामना अफगाणिस्तान विरोधात असेल.

पहिल्या आठवडा रिकामा जाऊ नये म्हणून लढवली क्ल्युप्ती

गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे चित्रपटगृह बंदच ठेवण्यात आल्यामुळे चित्रपटगृहात जाऊन सहकुटुंब किंवा मित्रमैत्रिणींसमवेत चित्रपट पाहाण्याच्या आनंदाला प्रेक्षकवर्ग मुकला होता. परंतु आता शुक्रवारीच चित्रपटगृहांचा पडदा उघडणार असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सध्या निर्माते किती प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये येतील याचा अंदाज घेऊनच नवीन चित्रपट प्रदर्शित करण्याच्या मानसिकतेत आहेत. त्यामुळे चित्रपटगृह खुली झाली तरी नवीन चित्रपट पाहाण्यासाठी प्रेक्षकांना अजून थोडी प्रतीक्षाच करावी लागणार आहे. मात्र, पहिल्या आठवडा रिकामा जाऊ नये यासाठी चित्रपटगृह चालकांनी एक अनोखी क्ल्युप्ती लढवली आहे.

हेही वाचा -अभिनेत्री अनन्या पांडे चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात पोहोचली

Last Updated : Oct 27, 2021, 7:13 AM IST

For All Latest Updates

TAGGED:

Pune

ABOUT THE AUTHOR

...view details