नवी दिल्ली -विश्वकरंडक स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर टीम इंडियाच्या गोटात तणावाचे वातावरण आहे. एकीकडे कर्णधार कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्वचिन्ह उपस्थित होत आहेत तर दुसरीकडे धोनीच्या निवृत्तीबाबत चर्चांना उधाण आले आहे. अशातच, भारतीय संघातील खेळाडूंना अजून एका कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
बायकोला जास्त वेळ दिल्याने टीम इंडियातील खेळाडू संकटात! - laws
यंदा झालेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेदरम्यान भारतीय संघातील खेळाडूंनी मुदतीपेक्षा जास्त काळ पत्नीला सोबत ठेवल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
यंदा झालेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेदरम्यान भारतीय संघातील खेळाडूंनी मुदतीपेक्षा जास्त काळ पत्नीला सोबत ठेवल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात येण्याची शक्यता आहे. खेळाडूंना आपल्या पत्नीला पंधरा दिवस सोबत ठेवण्याची परवानगी होती. मात्र, या नियमाचे उल्लंघन करत खेळाडूंनी जवळपास सात आठवडे पत्नीली सोबत ठेवले. त्यामुळे बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने खेळाडूंना धारेवर धरले आहे.
मे महिन्यात टीम इंडियातील एका खेळाडूने बीसीसीआयकडे विश्वकरंडक स्पर्धेदरम्यान पत्नी सोबत असावी अशी मागणी केली होती. परंतु, ही मागणी बीसीसीआयने फेटाळून लावली होती. या खेळाडूंचे नाव स्पष्ट होऊ शकले नसले तरी त्यामध्ये विराट अथवा रोहित असू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.