नवी दिल्ली - विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि इंग्लंड सामना रंगणार आहे. या स्पर्धेत आपले अस्तित्व टिकवण्यासाठी यजमान इंग्लंडला भारताविरुद्ध झुंजावे लागणार आहे. शिवाय, भारतीय संघ आज पहिल्यांदाच भगव्या रंगाची जर्सी परिधान करणार आहे. त्यामुळे या जर्सीमध्ये भारतीय संघाला प्रत्यक्ष मैदानावर पाहण्यासाठी सर्वजण आतूरतेने आहेत. पण, सोशल मिडियावर या जर्सीची लोकांनी खिल्ली उडवली आहे.
टीम इंडियाच्या भगव्या जर्सीची लोकांनी उडवली खिल्ली, वाचा काय म्हणाले - england vs india
या जर्सीमध्ये भारतीय संघाला प्रत्यक्ष मैदानावर पाहण्यासाठी सर्व जण आतूर आहेत. पण, सोशल मीडियावर या जर्सीची लोकांनी खिल्ली उडवली आहे.
नेटकऱ्यांनी या जर्सीला बोर्नव्हिटा, हॉर्लिक्स, संत्री, पेट्रोल पंपावरील कर्मचारी, स्विगी यासंर्वांची उपमा दिली आहे. एका फोटोमध्ये तर बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान सारख्या दिसणाऱ्या माणसाशी या जर्सीचा संबंध जोडला आहे.
आयसीसीच्या नियमानुसार विश्वकरंडक स्पर्धेत एका सामन्यात दोन्ही संघांची जर्सी एकाच रंगाची असल्यास, दोन्ही संघापैकी एका संघाला आपल्या जर्सीच्या रंगात बदल करावा लागतो. त्या नियमानुसार भारतीय संघ इंग्लडविरूद्ध खेळताना भगव्या रंगाच्या जर्सीत दिसणार आहे. त्यामुळे ही जर्सी भारताला 'लकी' ठरते का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.