लंडन - विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेला नुकतीच सुरुवात झाली आहे. सर्व संघ एकदम कसून सराव करत आहेत. टीम इंडियासुद्धा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱया पहिल्या सामन्यासाठी चांगलाच सराव करत आहे. साऊदम्टन येथे ५ जूनला होणाऱ्या सामन्यासाठी भारताचे सर्व खेळाडू सज्ज झाले आहेत. आफ्रिकेविरुद्ध होणाऱया सामन्यापूर्वी टीम इंडियाने एका जागेला भेट दिली. आणि क्रिकेटव्यतिरीक्त एक खेळसुद्धा खेळला
CRICKET WORLDCUP : क्रिकेट नाही, टीम इंडियाने खेळला 'हा' खेळ, फोटो व्हायरल - virat kohli
साऊदम्टन येथे असणाऱया प्रसिद्ध अशा 'पेंटबॉल' सत्राला टीम इंडियाच्या खेळाडूंनी भेट दिली. आपल्या नेहमीच्या सरावातून वेळ काढत त्यांनी पेंटबॉलच्या खेळाचा आनंद लूटला.
टीम इंडियाने पेंटबॉल खेळाचा आनंद घेतला
साऊदम्टन येथे असणाऱया प्रसिद्ध अशा 'पेंटबॉल' सत्राला टीम इंडियाच्या खेळाडूंनी भेट दिली. आपल्या नेहमीच्या सरावातून वेळ काढत त्यांनी पेंटबॉलच्या खेळाचा आनंद लूटला.
बीसीसीआयने टीम इंडियाचे हे खास फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. कर्णधार विराट कोहलीनेही आपल्या ट्विटर अकाऊंटवरून सर्व खेळांडूचा एक फोटो शेअर केला आहे.