महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

भारताने पाकला धुळ चारताच छोट्या तैमुरनेही केले अनोखे सेलीब्रेशन - taimur ali khan wearing indian cricket team jersey and salutes to team india

स्टारकिड तैमुर हा इंटरनेट जगतात प्रचंड प्रसिद्ध असून अनेक लोक त्याचे चाहते आहेत.

तैमुर

By

Published : Jun 17, 2019, 8:27 PM IST

नवी दिल्ली - विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर चाहत्यांकडून भारतीय संघाचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे. अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांचा मुलगा तैमुरनेही आपल्या स्टाईलमध्ये भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे.

सैफ अली खान आणि करीना कपूरसह मुलगा तैमुर

भारत - पाक सामन्यानंतर सध्या सोशल मीडियावर तैमुरचा एक गोंडस फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये त्याने भारतीय संघाची निळी जर्सी घातली आहे आणि तो हसऱ्या चेहऱ्याने सॅल्युट करत आहे.

स्टारकिड तैमुर हा इंटरनेट जगतात प्रचंड प्रसिद्ध असून अनेक लोक त्याचे चाहते आहेत. रविवारी विश्वकरंडकात झालेल्या सामन्यात भारताने पाकवर ८९ धावांनी मात केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details