चेस्टर ली स्ट्रीट - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत रिव्हर साईड ग्राउंडवर आज श्रीलंका- आफ्रिका सामना रंगणार आहे. स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी श्रीलंकेला विजय आवश्यक असून उपांत्य फेरीसाठी उर्वरित तिन्ही सामने जिंकावे लागतील. यजमान इंग्लंडला २० धावांनी पराभव केल्यामुळे लंकेचा आत्मविश्वास वाढला आहे. आतापर्यंत लंकेचे सहा गुण झाले आहेत. हा सामना दुपारी ३ वाजता सुरु होईल.
CRICKET WC : श्रीलंका आव्हान टिकवण्यासाठी आज आफ्रिकेशी भिडणार
हा सामना दुपारी ३ वाजता सुरु होईल.
श्रीलंका आव्हान टिकवण्यासाठी आज आफ्रिकेशी भिडणार
पाकिस्तानने आफ्रिकेला हरवल्यामुळे ते स्पर्धेबाहेर फेकेल गेले आहेत. आफ्रिकेचा सर्वोत्तम गोलंदाज कगिसो रबाडाची मंदावलेली कामगिरी ही आयपीएलची देण असल्याचे डु प्लेसीसने म्हटले होते. आजचा सामन्यात प्रतिष्ठा राखण्यासाठी आफ्रिकेचा संघ मैदानात उतरेल. फॉर्मात असलेल्या मलिंगासमोर आफ्रिकेचा संघ कसा खेळतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
दोन्ही संघ -
- दक्षिण आफ्रिका - फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अॅडेन मार्करम, क्विंटन डि कॉक (यष्टीरक्षक), हाशिम अमला, रॅसी वॅन डर ड्यूसेन, डेविड मिलर, एंडिले फेलुकवायो, जेपी ड्यूमिनी, ड्वेन प्रिस्टोरियस, ब्युरन हेंड्रिक्स, कगिसो रबाडा, लुंगी एनगिडी, ख्रिस मॉरिस, इमरान ताहिर, तब्रिज शम्सी.
- श्रीलंका -दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), लसिथ मलिंगा, अँजेलो मॅथ्यूज, थिसारा परेरा, कुशल परेरा, धनंजय डिसेल्वा, कुशल मेंडिस, आयसुरु उडाना, मिलींदा सिरिवर्धना, अविष्का फर्नांडो, जीवन मेंडिस, लाहिरु थिरिमन्ने, जेफ्री वंडरसे, नुवान प्रदीप, सुरांगा लकमल.
Last Updated : Jun 28, 2019, 11:17 AM IST