नवी दिल्ली - महेंद्रसिंग धोनी त्याच्या सैन्यावरील प्रेमामुळे कायम चर्चेत असतो. यंदाच्या विश्वकरंडकात धोनीने घातलेल्या ग्लोव्हजची खूप चर्चा झाली. शिवाय, अनेक वादविवादही चालू आहेत. यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेत धोनीप्रमाणेच वेस्ट इंडिजचा एक खेळाडू त्याच्या सैन्यप्रेमामुळे चर्चेत आला आहे.
CRICKET WORLDCUP : धोनीसारखाच 'हा' खेळाडूही आहे सैन्यप्रेमी; मैदानात करतो सॅल्यूट - शेल्डन कॉट्रेल
कॉट्रेलने वॉर्नर आणि मॅक्सवेलला बाद केल्यानंतर त्याच्या खास आर्मी शैलीत सॅल्युट केले होते. त्याचे असे सेलिब्रेशन पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातही पाहायला मिळाले होते.
या खेळाडूचे नाव आहे शेल्डन कॉट्रेल. वेस्ट इंडिजचा डावखुरा गोलंदाज शेल्डन कॉट्रेल विकेट घेतल्यावर कडक सॅल्युट ठोकतो. कॉट्रेलने वॉर्नर आणि मॅक्सवेलला बाद केल्यानंतर त्याच्या खास आर्मी शैलीत सॅल्युट केले होते. त्याचे असे सेलिब्रेशन पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातही पाहायला मिळाले होते. त्याच्या या सॅल्युटचा व्हिडिओ आयसीसीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
शेल्डन कॉट्रेलने २०१३-१४ मध्ये कसोटीत आणि २०१५ मध्ये वनडेत पदार्पण केले होतो. कॉट्रेल जमैकन सैन्यात आहे. आणि या सैन्याच्या सन्मानार्थ तो हे सॅल्यूट करतो असे त्याने सांगितले आहे.