लंडन -आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेतील २३व्या सामन्यात बांगलादेशने वेस्ट इंडिजला धक्का देत विजय मिळवला आहे. या सामन्यात धावांचा पाठलाग करताना शाकिब अल हसनने १२४ धावा करत शानदार शतक झळकावले. बांगलादेश क्रिकेटच्या इतिहासात सर्वोत्तम अष्टपैलू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाकिबने भारताचा माजी डावखुरा फलंदाज युवराज सिंगचा एक विक्रम मोडला आहे.
CRICKET WC : शाकिब अल हसनने मोडला युवराज सिंगचा विक्रम - west indies vs bangladesh
बांगलादेशकडून शाकिबने १२४ तर लिटन दासने केली ९४ धावांची दमदार खेळी करत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.
शाकिब ने या सामन्यात खेळताना वनडेमध्ये ६ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. हा टप्पा गाठण्यासाठी त्याने १९० डाव खेळले आहेत. त्याने वीरेंद्र सेहवाग व शिवनारायण चंद्रपॉल यांच्या कामगिरीशी बरोबरी केली. शिवाय, शाकिबने युवराज सिंग आणि संगकाराचा विक्रम मोडीत काढला.
या सामन्यात वेस्ट इंडिजने बांगलादेशसमोर विजयासाठी ३२२ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान बांगलादेशने ४२ व्या षटकामध्ये ३ गड्याच्या मोबदल्यात मिळवले. बांगलादेशकडून शाकिबने १२४ तर लिटन दासने केली ९४ धावांची दमदार खेळी करत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.