टाँटन - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत चालू असलेल्या २३व्या सामन्यात वेस्ट इंडिजने बांगलादेशसमोर विजयासाठी ३२२ धावांचे आव्हान ठेवले आहे. या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकत वेस्ट इंडिजला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. वेस्ट इंडिजकडून शाय होपने १२१ चेंडूत ९६ धावांची संयमी खेळी केली. त्याचे शतक अवघ्या ४ धावांनी हुकले असले तरी एक खास विक्रम त्याच्या नावावर झाला आहे.
CRICKET WC : ४ धावांनी शतक हुकलेल्या वेस्ट इंडिजच्या शाय होपने रचला विक्रम - shai hope
वेस्ट इंडिजकडून शाय होपने १२१ चेंडूत ९६ धावांची संयमी खेळी केली.
शाय होप
शाय होपने या सामन्यात १ हजार धावांचा टप्पा गाठला. असे करताना त्याने ३० डाव खेळले आहेत. सर व्हिव रिचर्ड्स या विक्रमाच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहेत. त्यांनी ही कामगिरी फक्त २१ डावात केली आहे.
दरम्यान, वेस्ट इंडिजकडून एव्हीन ल्युईसने ७०, शिमरॉन हेटमायरने ५० यांनी दमदार अर्धशतकी खेळी करत संघाची धावसंख्या तिनशेपार नेली. अखेरच्या षटकांमध्ये कर्णधार होल्डरने शानदार फटकेबाजी करत ४ चौकार व २ षटकारांच्या मदतीने १५ चेंडूत ३३ धावा चोपल्या.