लंडन -आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानने बांग्लादेशावर 94 धावांनी विजय मिळविला. या विजयानंतर पाकिस्तानचा अनुभवी खेळाडू शोएब मलिक याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. या निवृत्तीवर शोएबची पत्नी सानिया मिर्झाने भावनिक ट्विट केले आहे.
शोएबच्या निवृत्तीनंतर सानियाची भावनिक प्रतिक्रिया - pakistan vs bangladesh
शोएब मलिकने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटच्या कारकिर्दीत 9 शतके आणि 44 अर्धशतके ठोकली आहेत.
सानिया म्हणाली, 'प्रत्येक कथेला एक अंत असतो. पण जीवनातील प्रत्येक अंतानंतर एक नवीन सुरुवात असते. तू तुझ्या देशासाठी अभिमानाने २० वर्ष खेळलास. तू जे मिळवलस आणि तू जो आहेस त्याबद्दल इझान आणि मला अभिमान वाटतो.'
शोएब मलिकने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटच्या कारकिर्दीत 9 शतक आणि 44 अर्धशतके ठोकली आहेत. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 158 बळी घेतल्या आहे. तर 7534 धावा केल्या आहेत. त्याने निवृत्तीची घोषणा ही आपल्या ट्विटर अकाऊंटद्वारे दिली. यात शोएबने आपल्या सहकाऱ्यांचे आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत.