लंडन - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाला अफगाणिस्तानवर मात करताना चांगलीच 'दमछाक' झाली होती. मात्र, या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा ११ धावांनी पराभव केला. या विजयानंतरही भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर संघाच्या कामगिरीवर खुश नाही. त्याने एका मुलाखतीत, मधल्या फळीतील फलंदाज महेंद्रसिंह धोनी आणि केदार जाधव यांनी संथ खेळी केल्याचे बोलुन दाखवलेल होते. आता त्यावर चाहत्यांनी आपली नाराजी व्यक्त करत सचिनवर टीका केली आहे.
चाहत्यांकडून सचिनला मास्टरस्ट्रोक ! धोनीच्या 'त्या' खेळीबद्दल म्हणणे पडले महागात - cricket world cup
सचिनने केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मिडिया आणि ट्विटरवर त्याला ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे.

'आपण अजुन चांगला खेळ करु शकलो असतो. केदार जाधव आणि महेंद्रसिंह धोनी यांनी केलेल्या भागीदारी ही अतिशय संथ होती. आपण अफगाणिस्तान विरुध्दच्या सामन्यात ३४ षटके फिरकी गोलंदाजीवर खेळलो आणि यात फक्त ११९ धावा केल्या. फिरकी गोलंदाजीवर खेळताना आपण प्रचंड चाचपडत होतो.' असे सचिनने मुलाखतीत सांगितले होते. सचिनने केलेल्या या वक्तव्यामुळे सोशल मिडिया आणि ट्विटरवर त्याला ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे.
'सचिनला काही ट्रोलर्सनी त्याने केलेल्या संथ खेळीची आठवणही करुन दिली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात धोनीने 52 चेंडूंत 28 धावा केल्या होत्या.