मॅनचेस्टर -आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तान विरुध्द खेळताना भारताने जबरदस्त प्रदर्शन करत ८९ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माने 'धुवांधार' खेळी केली. रोहितने ८५ बॉलमध्ये आपले शतक पूर्ण केले. त्याने ११३ बॉलमध्ये १४० धावांची खेळी केली. यात त्याने १४ चौकार आणि ३ षटकार मारत पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलाच 'समाचार' घेतला.
CRICKET WC : हिटमॅनच्या 'त्या' षटकाराने मास्टरब्लास्टर सचिनच्या खेळीची आठवण - रोहित शर्मा
रोहितने ८५ बॉलमध्ये आपले शतक पूर्ण केले. त्याने ११३ बॉलमध्ये १४० धावांची खेळी केली.
हिटमॅन की मास्टरब्लास्टर
रोहितने या सामन्यात मारलेल्या एका षटकारामुळे २००३ साली विश्वचषक स्पर्धेतील सचिनच्या एका षटकाराच्या आठवण जागी झाली. सचिनने २००३ च्या विश्वकरंडक स्पर्धेत पाकविरुद्ध खेळताना शोएब अख्तरच्या गोलंदाजीवर खेचला होता. तर, या सामन्यात रोहितने ८५ धावांवर खेळत असताना हसन अली याला षटकार मारला.
२००३ सालच्या सामन्यामध्ये सचिनला शतकाने हुलकावणी दिली होती. सचिन ९८ धावांवर बाद झाला होता, परंतु रोहितने मात्र आपले शतक पूर्ण केले.