महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'या' बॉलिवूड कलाकारांनी केली ट्रोल होणाऱ्या पाक कर्णधार सरफराजची पाठराखण - cricket world cup

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री गौहर खान हे सरफराजसाठी सरसावले आहेत.

पाक कर्णधार

By

Published : Jun 25, 2019, 1:06 PM IST

नवी दिल्ली - आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ-लुईस नियमानुसार भारताने पाकिस्तानवर ८९ धावांनी विजय मिळविला. या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आणि संघाला अनेकांनी ट्रोल करायला सुरुवात केली होती. शिवाय, पाक कर्णधार सरफराज अहमदलादेखील प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले होते. पाकच्याच एका चाहत्याने व्हिडिओद्वारे सरफराज मुलीसोबत असताना टीका टिप्पणी केली होती. त्यानंतर त्या चाहत्याला नेटकऱ्यांनी धारेवर धरले होते. आता, काही बॉलिवूड कलाकारांनीदेखील सरफराजची या घटनेवरून पाठराखण केली आहे.

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री गौहर खान हे सरफराजसाठी सरसावले आहेत. त्यांनी ट्विटरवरुन त्या चाहत्याला या घटनेसंबंधी खडसावले आहे. रितेशने म्हटले आहे, 'इतिहासात प्रत्येक कर्णधाराने महत्वाचा सामना गमावला आहे. सरफराजसाठी हे अपेक्षित नाही. ही छळवणूक आहे. कृपा करा जरा. तो त्याच्या मुलीसोबत आहे.'

रितेशने ट्विटरवरुन त्या चाहत्याला प्रतिक्रिया दिली आहे.

तर गौहरनेदेखील तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, 'काय मूर्ख माणूस आहे. त्याला लाजही नाही. एक खेळाडू फक्त चांगली कामगिरी करत नाही म्हणून हे असे करणार तुम्ही? या माणसाची लाज वाटते. विशेषत: त्याची मुलगी सोबत असताना.' या बॉलिवूड कलाकारांप्रमाणेच नेटकऱ्यांनीही या चाहत्यावर टीका केली होती.

गौहरने ट्विटरवरुन त्या चाहत्याला प्रतिक्रिया दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details