लंडन - विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात इंग्लंडने दमदार प्रदर्शन करत दक्षिण ऑफ्रिकेला १०४ धावांनी नमवले. प्रथम गोलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची इंग्लंडच्या फलंदाजांनी चांगलीच धुलाई केली. बेन स्टोक्सने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या बळावर इंग्लंडने दक्षिण ऑफ्रिकेपुढे ३११ धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र, दक्षिण आफ्रिकेचा संघ २०७ धावातच गारद झाला. या सामन्यात काही विक्रम पाहायला मिळाले.
CRICKET WORLDCUP : विश्वकरंडकाच्या पहिल्याच सामन्यात झाले 'हे' विक्रम - imran tahir
विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात काही विक्रम पाहायला मिळाले.
विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात काही विक्रम पाहायला मिळाले.
'हे' आहेत विश्वकरंडकाच्या पहिल्याच सामन्यात झालेले विक्रम
- विश्वकरंडकामध्ये सलामीच्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने एक नवा इतिहास रचला. मॉर्गनने इंग्लंडसाठी खेळलेला हा २००वा एकदिवसीय सामना असून अशी कामगिरी करणारा तो इंग्लंडचा पहिलाच खेळाडू ठरला आहे.
- दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू इम्रान ताहीरने एक विक्रम केला. आफ्रिकेचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसने ताहीरच्या हातात पहिलेच षटक सोपवले आणि ताहीरने त्याचा विश्वास सार्थ ठरवत आपल्या पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर सलामीवीर जॉनी बेअरस्टोला माघारी धाडले. अशी कामगिरी करणारा इम्रान हा पहिलाच फिरकीपटू तर क्रिकेटविश्वातला दुसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी 1992च्या विश्वकरंडक स्पर्धेत असा विक्रम करण्यात आला होता.
- यंदाच्या विश्वकप स्पर्धेमध्ये पहिले अर्धशतक झळकावण्याचा मान इंग्लंडच्या सलामीवर जेसन रॉयला मिळाला.
- या स्पर्धेत जोफ्रा आर्चरने इंग्लंडसाठी पहिला बळी घेतला.