मुंबई - 'द वॉल' या नावाने ओळखला जाणाऱ्या राहुल द्रविडची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी निवड झाली आहे. यामुळे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार असलेल्या द्रविडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. बीसीसीआयने या नियुक्तीबाबत खुलासा केला आहे.
राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी राहुल द्रविडची निवड; बीसीसीआयची घोषणा - national cricket academy
अकादमीमध्ये द्रविड खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचे काम करणार आहे.

बीसीसीआयने म्हटले आहे, 'द्रविडची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी निवड झाली आहे. अकादमीमध्ये द्रविड खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचे काम करणार आहे. शिवाय तो क्रिकेटसंबंधित इतर कार्यक्रमही पाहणार आहे'. द्रविड सध्या अंडर-19 भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी कार्यरत आहे.
बीसीसीआयने म्हटल्याप्रमाणे, द्रविड पुरुष आणि महिला क्रिकेट संघांच्या प्रशिक्षकांसोबत काम करणार आहे. शिवाय, तो अंडर-19, अंडर-23 संघांच्या प्रशिक्षकपदाचीही जबाबदारी सांभाळेल. द्रविड 2016 पासून भारताच्या अंडर-19 संघाचा प्रशिक्षक आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली, या संघाने 2018 चा विश्वकरंडक उंचावला होता.