नॉटिंगहॅम - आज विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यात सलग दुसऱ्या विजयासाठी पाकिस्तान आणि श्रीलंका भिडणार आहेत. उभय संघाना पहिल्या सामन्यात दारुण पराभव पत्करावा लागला होता. मात्र, दुसऱया सामन्यामध्ये दोन्ही संघांनी विजयी पताका फडकावली होती. आज होणाऱ्या सामन्यात विश्वकपचा इतिहास पाहता पाकिस्तानचे पारडे जड मानले जात आहे. हा सामना दुपारी ३ वाजता सुरू होईल.
श्रीलंकेने भेदक गोलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तानवर ३४ धावांनी विजय मिळवला असला तरी फलंदाजांची कामगिरी म्हणावी तितकी चांगली झालेली नाही. तर दुसरीकडे पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात पाकने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत 50 षटकांमध्ये 348 धावांचा डोंगर उभा करुन विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील पहिला विजय मिळवला होता.