महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

भारताने खूपच वाईट फलंदाजी केली; तर 'चोकर्स'चा शिक्का पुसून न्यूझीलंड विजयी झाला - शोएब अख्तर - रवींद्र जाडेजा

भारताने खूपच वाईट फलंदाजी केली. एकदम साध्या चेंडूवर भारतीय फलंदाजांनी विकेट दिल्या. पहिल्या ४-५ विकेट पडल्यानंतर भारत सामन्यात पुनरागमन करेल, असे कधीही वाटले नव्हते.

शोएब अख्तर

By

Published : Jul 11, 2019, 1:18 PM IST

मुंबई - भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्वकरंडक सामन्यातील पहिला उपांत्य सामना ओल्ड ट्रॅफर्ड, मॅनचेस्टर येथे झाला. न्यूझीलंडने २४० धावांचा बचाव करताना बलाढ्य भारतीय संघाला १८ धावांनी धूळ चारली. या सामन्यावर शोएब अख्तरने भारतीय फलंदाजीवर टीका केली. तर, न्यूझीलंड संघाची प्रशंसा करताना त्यांचे अभिनंदन केले.

शोएब म्हणाला, भारत हरला आणि न्यूझीलंड चोकर्सचा शिक्का मिटवून विजयी झाले. न्यूझीलंड संघाचे खूप खूप अभिनंदन. रवींद्र जाडेजाची लढाऊ वृत्ती पाहून मज्जा आली. जाडेजानी चांगली फलंदाजी केली. धोनीने पुन्हा एकदा दाखवून दिले, की तो संघाचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. धोनी तु धाव घेताना डाईव्ह मारायला पाहिजी होती. भारत सामना जिंकण्याच्या खुप जवळ आला होता. परंतु, भारताने खूपच वाईट फलंदाजी केली. एकदम साध्या चेंडूवर भारतीय फलंदाजांनी विकेट दिल्या. पहिल्या ४-५ विकेट पडल्यानंतर भारत सामन्यात पुनरागमन करेल, असे कधीही वाटले नव्हते. भारताच्या पहिल्या ४-५ फलंदाजांपैकी एक किंवा दोन फलंदाज खेळपट्टीवर टिकून राहिले असते. तर, भारताने आरामात सामना जिंकला असता.

भारतीय फलंदाज ऑफ स्टंम्पवरुन जाणाऱ्या चेंडूवर बाद झाले. रोहित शर्मा चांगल्या चेंडूवर बाद झाला. परंतु, विराट कोहली हा अनलकी ठरला. विराटला बाद देण्याचा निर्णय हा चुकीचा होता. परंतु, भारताने चांगली लढत दिली. भारताकडून एवढ्या लढाईची अपेक्षा नव्हती. जाडेजा मैदानावर आल्यानंतर भारताने सामन्यात पुनरागमन केले. भारत सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावर होता. जाडेजा षटकार मारायचा चेंडूवर बाद झाला. धोनीने षटकार मारल्यानंतर भारत सामना जिंकणार असे वाटत होते. धोनी धावबाद झाला नसता तर त्याने एकहाती सामना जिंकवला असता. जाडेजाने चांगली फलंदाजी केली नसती तर भारत खूप मोठ्या फरकाने हरला असता.

भारताने चांगली लढत दिली. मी भारताच्या जनतेसाठी सांगत आहे, की तुमच्या संघाने चांगली कामगिरी केली. उपांत्य फेरीत पोहचल्याबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन. भारतीय संघ प्रशंसा करण्यासाठी पात्र आहे. कारण, भारताने पूर्ण विश्वकरंडकात चांगली कामगिरी केली. न्यूझीलंड संघाचे अभिनंदन. तुम्ही आता चोकर्स राहिले नाहीत. वेल डन न्यूझीलंड. अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा, असेही शोएब अख्तर म्हणाला.

ABOUT THE AUTHOR

...view details