लंडन -आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला ४९ धावांनी पराभूत केले. पाकने पाचपैकी तीन सामने गमावले आहेत. भारताविरुद्धच्या सामन्यात पाकचा ८९ धावांनी पराभव झाला. या सामन्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आणि संघाला अनेकांनी ट्रोल करायला सुरुवात केली. शोएबने पाकिस्तानचा कर्णधार सरफराजला 'बिनडोक' कर्णधार म्हटले होते. आता सरफराजने त्याला तिखट उत्तर दिले आहे.
'काही लोकं टीव्हीसमोर बसून स्वत: ला देव समजतात', सरफराजचा अख्तरला टोला
शोएबने पाकिस्तानचा कर्णधार सरफराजला 'बिनडोक' कर्णधार म्हटले होते.
सरफराज म्हणाला, "आता मी जर काही बोललो तर ते परत आमच्यावर टीका करणार, त्यांच्या मते आम्ही खेळाडूच नाही आहोत. आम्ही कोण आहोत हे आम्हाला सांगण्याची गरज नाही. काही बोललो तर ते म्हणतील उत्तर का दिले. काही लोकं टीव्हीसमोर बसून स्वत: ला देव समजतात"
भारत - पाक सामन्यानंतर रावळपिंडी एक्स्प्रेस समजल्या जाणाऱ्या पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने आपल्या नेहमीच्या खुमासदार शैलीत पाकिस्तानच्या संघावर ताशेरे ओढले होते. रोहित शर्माच्या १४० धावांच्या शतकी आणि कर्णधार विराट कोहलीच्या ७७ धावांच्या जोरावर भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी ३३७ धावांचे आव्हान दिले होते. पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ-लुईस नियमानुसार पाकिस्तानला ४० षटकांमध्ये ३०२ धावांचे आव्हान देण्यात आले होते. पण पाकिस्तानला भारताचे हे आव्हान पेलवले नाही.