बर्मिंगहॅम - आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात इंग्लड क्रिकेट संघाने भारताचा ३१ धावांनी पराभव केला. निर्णायक सामन्यात दमदार खेळ करत इंग्लंडने स्पर्धेत अपराजित असलेल्या भारतावर विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथमच भगव्या रंगाची जर्सी घातली होती. त्यामुळे सोशल मीडियावर या पराभवाचे खापर भगव्या जर्सीवर फोडण्यात आले आहे.
'ये भगवा रंग भारतीयों के लिए अशुभ है' भारताच्या पराभवानंतर नेटकऱ्यांच्या संतंप्त प्रतिक्रिया - ind vs england
आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लड संघाने भारताचा ३१ धावांनी पराभव केला.
ये भगवा रंग भारतीयों के लिए अशुभ है
या भगव्या जर्सीवर नेटकऱ्यांच्या संतंप्त प्रतिक्रिया आल्या आहेत. आयसीसीच्या नियमानुसार विश्वकरंडक स्पर्धेत एका सामन्यात दोन्ही संघांची जर्सी एकाच रंगाची असल्यास, दोन्ही संघापैकी एका संघाला आपल्या जर्सीच्या रंगात बदल करावा लागतो. म्हणून नियमानुसार भारतीय संघाने इंग्लडविरूद्ध खेळताना भगव्या रंगाच्या जर्सीचा वापर केला.