बर्मिंगहॅम - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तान विरुध्द न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यात पाकिस्तानने ६ बळी राखून विजय मिळवला. न्यूझीलंडने दिलेले २३८ धावांचे आव्हान पाकने बाबर आझम (नाबाद १०१ धावा) शतकी खेळी आणि हरिस सोहेलच्या ६८ धावांच्या मतदीने पूर्ण केले. न्यूझीलंडकडून जेम्स नीशमने सर्वाधिक ९७ धावा केल्या. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत नीशमने 'सामना हरलो असलो तरी आम्हाला काही फरक पडत नाही' असे म्हटले आहे.
CRICKET WC : पाकविरुद्ध सामना हरल्यानंतर न्यूझीलंडचा नीशम म्हणतो, 'आम्हाला काही फरक पडत नाही'
न्यूझीलंडकडून जेम्स नीशमने सर्वाधिक ९७ धावा केल्या
नीशम म्हणाला, 'स्पर्धेत इतर चांगले संघ असल्यामुळे प्रत्येक सामना जिंकणे हा विचार मूर्खपणाचा आहे. आमच्यासाठी सेमीफायनलमध्ये जागा मिळवणे महत्वाचे आहे. त्यानंतर विजेतेपद फक्त दोन पाऊल दूर आहे. त्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही.'
२३८ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानची सुरुवात चांगली नाही. सलामीवीर फखर झमान संघाच्या १९ धावा झाल्या असताना बाद झाला. त्यानंतर पुन्हा इमाम उल हक दहाव्या षटकात संघाची धावसंख्या ४४ असताना बाद झाला. यानंतर मात्र, मोहम्मद हाफिज आणि बाबर आझम याने संघाची परझड रोखली. मोहम्मद हाफिज वैयक्तिक ३२ धावा करून बाद झाला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या हरिस सोहेल आणि बाबर आझम या दोघांनी भागिदारी रचत पाकच्या विजयाचा मार्ग सुकर केला. विजयाची औपचारिकता बाकी असताना हरिस सोहेल ६८ धावांवर धावबाद झाला.