साऊदम्पटन - भारत विरुद्ध अफगाणिस्तानच्या यांच्यातील विश्वकरंडकातील २८ व्या सामन्यात अफगाणी फिरकीपुढे टीम इंडियाने लोटांगण घातले. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली होती. मात्र अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत भारताला २२४ धावांमध्ये रोखले. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनीने २८ धावांची संथ खेळी केली.
कॅप्टन कुल धोनी स्वत: 'इतक्या' वेळा झाला आहे यष्टीचीत - ind vs afghanistan
अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानने धोनीला बाद केले.
अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानने धोनीला बाद केले. राशिदच्या षटकात धोनी यष्टीचीत झाला. एकदिवसीय कारकिर्दीत धोनी फक्त दोन वेळाच यष्टीचीत झाला आहे. पहिल्यांदा तो विश्वचषक स्पर्धेतच यष्टीचीत झाला होता. 2011 ला विंडीज विरुद्धच्या सामन्यात धोनी यष्टीचीत झाला होता.
अफगाणिस्तान आणि भारत हे संघ प्रथमच विश्वकरंडकात आमने-सामने खेळत आहेत. आजच्या सामन्यासाठी भारताने भुवनेश्वर कुमारच्या जागी मोहम्मद शमीला संघात स्थान देण्यात आले आहे. तर अफगाणिस्तानने त्यांच्या संघात २ बदल केले असून नूर अलीऐवजी हजरतूल्लहा झझाईला तर दवलत झादरनऐवजी अफताब आलमला संघात स्थान दिले आहे.