महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'हे' आहेत यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेत सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक बळी घेणारे पहिले पाच खेळाडू - rohit sharma

टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्माने यंदाच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक  धावा चोपल्या आहेत. तर, मिचेल स्टार्क सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत प्रथम राहिला आहे.

'हे' आहेत यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेत सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक बळी घेणारे पहिले पाच खेळाडू

By

Published : Jul 15, 2019, 9:50 AM IST

लंडन -लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा २०१९ चा ऐतिहासिक अंतिम सामना रविवारी पार पडला. अत्यंत चुरशीच्या लढतीत इग्लंड संघाने चौकार षटकारांच्या निकषावर न्यूझीलंडचा पराभव केला. या सामन्यामध्ये बेन स्टोक्सला सामनावीर तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला मालिकावीराचा किताब भेटला.

या स्पर्धेमध्ये काही फलंदाजांनी खोऱयाने धावा काढल्या आहेत. त्यामध्ये टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्माने यंदाच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक धावा चोपल्या आहेत. त्याने ९ सामन्यात ८१ च्या सरासरीने ६४८ धावा केल्या आहेत. तर डेव्हिड वॉर्नर फक्त एका धावामुळे रोहितच्या पिछाडीवर पडला आहे. त्याने ७१ च्या सरासरीने ६४७ धावा केल्या आहेत.

तर काही गोलंदाजांनी या स्पर्धेत फलंदाजांना सळो की पळो करुन सोडले आहे. आपल्या वेगवान गोलंदाजीमुळे मिचेल स्टार्क सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत प्रथम राहिला आहे. त्याने एकूण २७ बळी घेतले आहेत. तर उपविजेत्या संघाचा लॉकी फर्ग्युसन २१ बळी घेत दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details