महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'भारत जिंकल्यानंतर मला आत्महत्या करावीशी वाटली' - cricket world cup

पाकिस्तानचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी 'भारत जिंकल्यानंतर मला आत्महत्या करावीशी वाटली' असे म्हटले आहे.

मिकी आर्थर

By

Published : Jun 25, 2019, 9:07 AM IST

लंडन - सध्या इंग्लडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत भारत विरुध्द पाकिस्तान सामना मँचेस्टरच्या मैदानावर पार पडला. हा सामना भारताने डकवर्थ लुईस नियमाने ८९ धावांनी जिंकला. या सामन्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आणि संघाला अनेकांनी ट्रोल करायला सुरुवात केली. पाकिस्तानचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी 'भारत जिंकल्यानंतर मला आत्महत्या करावीशी वाटली' असे म्हटले आहे.

मिकी आर्थर यांनी एका पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केले आहे. ते पुढे म्हणाले, 'रविवारी अफ्रिकेसोबत झालेल्या सामन्यात पाकिस्तानी संघाने त्यांना हरवले. ही गोष्ट माझ्यासाठी समाधानकारक असली तरीही जेव्हा आम्ही भारतासोबत सामना हरलो तेव्हा मला वाटले की आत्महत्या करावी.'

भारत - पाक सामन्यानंतर रावळपिंडी एक्स्प्रेस समजल्या जाणाऱ्या पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने आपल्या नेहमीच्या खुमासदार शैलीत पाकिस्तानच्या संघावर ताशेरे ओढले होते. रोहित शर्माच्या १४० धावांच्या शतकी आणि कर्णधार विराट कोहलीच्या ७७ धावांच्या जोरावर भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी ३३७ धावांचे आव्हान दिले होते. पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ-लुईस नियमानुसार पाकिस्तानला ४० षटकांमध्ये ३०२ धावांचे आव्हान देण्यात आले होते. पण पाकिस्तानला भारताचे हे आव्हान पेलवले नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details